हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहरातील हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयात प्रतिभावान लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची 103 वी जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते ह्या होत्या. याप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या विचार आणि कार्यावर माननीय प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते यांनी आपले विचार व्यक्त केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे क्रांतिकारी विचार आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे उपेक्षितांच्या उद्धारासाठी चे कार्य ते आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे खऱ्या अर्थाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विचार समाजात रुजणं आणि शोषित उपेक्षित वंचित असलेल्या घटकांसाठी आपण सर्वांनी पुढे येणं ही काळाची गरज आहे .तीच खऱ्या अर्थाने अण्णाभाऊंना आदरांजली ठरेल. अशी भूमिका प्राचार्यांनी व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. सविता बोंढारे यांनी केले तर आभार प्रा. आशिष दीवडे यांनी मानले त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.