हिमायतनगर प्रतिनिधी /-शहरातील परमेश्वर गल्ली येथील नवनिर्माण महिला दुर्गा मंडळा कडून दरवर्षी शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साह साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि 22 ऑक्टोंबर रोजी येथील दुर्गा मंडळासमोर येथील महिलांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून स्वतः रक्तदान करत इतर महिलांनी सुद्धा रक्तदान करण्याचा संदेश समाजाला दिला आहे त्यांच्या या उपक्रमाचे येथील डॉक्टर राजेंद्र वानखेडे यांनी कौतुक करून अभिनंदन केले…
कार्यक्रमाच्या सुरुवातीला येथील दुर्गा मातेची आरती डॉ. राजेंद्र वानखेडे साहेब, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड , भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गजानन चायल व विलास वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉक्टर वानखेडे यांनी असे सांगितले की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे रक्तदान केल्याने शरीरा मधील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघते व नवीन रक्त तयार होते त्यामुळे जास्तीत जास्त नव तरुणांनी रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले त्यामुळे उपस्थित नवनिर्माण दुर्गा मंडळाच्या महिला रुपाली काळे,सरस्वती लुटे सह आदी महिलांनी आम्ही सुद्धा या रक्तदान शिबिरात रक्तदान करणार आहोत असे सांगून नारी शक्तीने रक्तदान करण्यासाठी पुढाकार घेतला त्यामुळे यांच्या या निर्णयाचे उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी अभिनंदन केले
यावेळी यावेळी डॉक्टर वानखेडे साहेब, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल, शिवसेना उपतालुका प्रमुख विलास वानखेडे,माधवराव खडूजी काळे, बजरंग दल तालुका संयोजक सोपान कोळगिर, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले, मारोती हरडपकर,राहुल कारमोड, सदानंद काळे,कृष्णा बोलसे,परमेश्वर डाके,सह येथील दुर्गा मंडळाच्या असंख्य महिला व तरुण मंडळी उपस्थित होते