हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- शहर हे हिंदू मुस्लिम एकोप्याचे किर्तीवंत उदाहरण असल्याने हिमायतनगर शहरात दरवर्षीच बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण मोठ्या आनंद व उत्सवात साजरे होतात त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे साहेब ,भोकर येथील पोलीस उपविभागीय अधिकारी शफकत आमना व डेप्युटी पोलीस अधीक्षक धरणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर शहरात सण उत्सव काळात शांतता कायम ठेवण्यासाठी येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक बि.डी. भुसनूर यांनी हैद्राबाद येथून एक रॅपिड ॲक्शन फोर्स ची स्पेशल तुकडी हिमायतनगर शहरातील आगामी होणाऱ्या बकरी ईद व आषाढी एकादशीच्या अनुषंगाने स्पेशल बंदोबस्त बोलून आज दि 17 जून रोजी हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्याने त्यांचा रूट मार्च काढून शहरातील नागरिकांना सण उत्सव काळात शांततेचे आव्हान केले आहे..
यावेळी हिमायतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण बी. डी. भुसनुर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी, अजिनाथ पाटील, रॅपिंग ऍक्शन फॉर्सचे डेप्युटी कमांडर टी.पी. बगेल साहेब, महिला इन्स्पेक्टर भाव्या मॅडम व जटाशंकर यादव यांच्या सह रॅपिड ॲक्शन फोर्स चे साठ कमांडर व हिमायतनगर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते