हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- शहरात मागील काही महिन्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीत अनेक गोरगरीब शेतकरी व नागरिकांच्या मातीच्या भीती व घरा वरील टीन पत्रे वादळी वाऱ्यामध्ये उडून गेली होती तर काही जणांच्या भिंती पाण्याच्या पावसाने पडुन शहरातील अनेकांचे संसार उघड्यावर आले होते त्यां गोरगरीब नागरिकांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदान निधीच्या वाटपासाठी विलंब होत होता त्यामुळे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्फत वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करून येथील माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी शहरातील 68 लाभार्थ्यांना हा निधी मिळून दिला आहे त्या निधीच्या धनादेशाचे वाटप दिनांक 3 जून रोजी विद्यमान तहसीलदार यांच्या हस्ते देण्यात आले
शहरातील अतिवृष्टी मध्ये बाधित झालेल्या लाभार्थ्यांना शासनाकडून सानुग्रह निधी मंजूर करण्यात आला होता त्या निधीचे वाटप काही तांत्रिक कारणामुळे रखडले असल्याने येथील माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी येथील नगरपंचायत व तहसील प्रशासनास 5 दिवसाच्या आत हा निधी लाभार्थ्यांना वाटप करावा अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करू असा इशारा देताच येथील प्रशासनाने तात्काळ शहरातील 68 लाभार्थ्यांच्या खात्यावर सानुग्रह अनुदानाचे पैसे दि पाच जून रोजी जमा केल्याची माहिती माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील काही दिवसांपूर्वी हिमायतनगर शहरात झालेल्या जोरदार अतिवृष्टी मध्ये अनेक घरांची पडझड झाली होती त्याचे नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी व तलाठी ह्यांनी पंचनामे करून सर्व अहवाल शासन दरबारी जमा करून सुद्धा त्या नैसर्गिक आपत्तीचा निधी येथील तहसील व नगर पंचायत प्रशासनांकडून का वाटप करण्यात आला नाही ? ह्याचा जाब विचारण्यासाठी येथील कर्तव्यदक्ष माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड,गजानन चायल,विलास वानखेडे यांनी येथील महसूल प्रशासनास दी 24 मे रोजी धारेवर धरून आठ दिवसात हा निधी तात्काळ वाटप करा अन्यथा सर्व लाभार्थ्यांना घेऊन ठिय्या आंदोलन करू असा इशारा प्रशासनास दिला होता त्या अतिवृष्टी मध्ये शासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा निधी सुद्धा शासनाकडे जमा झालेला आहे पण येथील महसूल व नगर पंचायत प्रशासनाच्या काम चुकार पणामुळे ह्या सानुग्रह निधीचे वाटप करण्यात आले नव्हते त्यामुळे शहराचे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड सह त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथील तहसीलदार गायकवाड साहेब यांना ह्याचा जाब विचारताच त्यांनी दि 3 जून रोजी पर्यंत हे काम मार्गी लावण्यासाठी मुद्दतवाढ मागितली होती ते काम आज दि 5 जून रोजी मार्गी लागले आहे शहरातील जवळपास 68 अतिवृष्टी बाधित लाभार्थ्यांच्या खात्यावर सानुग्रह निधी जमा झाला आहे तो लवकरच लाभार्थ्यांना आपल्या खात्यातून उचलून घेता येईल असे माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी सांगितले यावेळी उपस्थित एका लाभार्थ्यास विद्यमान तहसीलदार गायकवाड साहेब , नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी ताडेवाड साहेब व माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते धनादेशाच्या चेकचे वाटप करण्यात आले यावेळी गजानन चायल,शिवसेना उप तालुका प्रमुख विलास वानखेडे, प्रकाश रामदीनवार, राम नरवाडे,अनिल भोरे,प्रदीप नरहारे, पत्रकार नागेश शिंदे सह आदी जण उपस्थित होते