हिमायतनगर प्रतिनिधी | तालुक्यात दोन दिवसाच्या उघडीनंतर काल दिनांक 26 जुलै च्या रात्रीपासून जोरदार अतिवृष्टी झाल्याने या परिसरातील वडगाव ज.,विरसणी सह 15 गावांना पुराच्या पाण्याने वेडल्यामुळे आज दिनांक 27 जुलै रोजी पाच तास अनेक गावाचा शहराशी संपर्क तुटला होता त्यात नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी पावसाच्या पाण्याने पूर्ण खरडून त्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे
हिमायतनगर तालुक्यात दिनांक 27 जुलै रोजी जोरदार अतिवृष्टी झाल्याने अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेडा घातला असल्याचे पाहायला मिळाले तर 15 गावचा हिमायतनगर शहराशी 5 तास संपर्क तुटला होता त्यामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले असल्याचे पहायला मिळाले होते त्यात वडगाव ज हे संपूर्ण गाव पुराच्या पाण्यात आल्याने तालुक्यातील खरिपाची पिके पाण्याखाली गेल्याने अनेक नदी नाल्यांना पूर येऊन शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन ,मूग, उडीद तूर,सह आदी पिकांचे पावसाच्या पाण्याने अतोनात नुकसान झाले आहे तर अनेक शेतकऱ्यांची पिके पाऊसाच्या पाण्यात खरडून गेली त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे ह्याचे तात्काळ महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी व तालुका कृषी कार्यालयाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळून द्यावी अशी मागणी वडगांव ज येथील शेतकरी राम बिरकुरे, विरसनी येथील ज्ञानेश्वर शेवाळे सह आदी जणांनी केली आहे