नांदेड |प्रतिनिधि | हिंदूराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय भाई देसाई ह्यांच्या विरुद्ध जाणीवपूर्वक षंडयंत्र रचुन खोटा गुन्हा दाखल करुन दिनांक – १ऑगस्ट २०२३ ह्या दिवशी अटक करण्यात आलेली आहे . त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जो कट रचण्यात आलेला आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. ह्या गुन्ह्यातील फिर्यादी बलकवडे नामक व्यक्ती ३०२ गुन्ह्यातील आरोपी आहे. खुनाचे आरोप असलेला हा व्यक्ती शेतकऱ्यांना त्रास झाल्याचे तसेच शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे खोटे कट कारस्थान झाल्याचे सांगुन देव देश आणि धर्मासाठी अहोरात्र झटणारे धनंजय भाई देसाई यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्याचा बोलविता धनी कोण आहे याचाही तपास झालाच पाहिजे.
मुळात ओम साई इंटरप्रायझेस ह्या नावाने बलकवडेचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे.अनेक जमिनीवर ताबा मारुन जमिनीच्या व्यवहारात कमिशन घेऊन स्वतःची उपजीविका चालवणारी ही व्यक्ती जिथे साधे सात बारावर नाव नाही ती व्यक्ती स्वतःला शेतकरी कसे काय म्हणून शकतो ? शेतकरी असल्याचा नावाखाली जमिनीच्या उलाढाली करून खोट्या केसेस करून सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार अतिशय चुकीचा आहे.
प्रदीप बलकवडे ह्या व्यक्तीवर ३०२ अन्वये खुनाचा तसेच तो करीत असलेल्या जमिनी खरेदी विक्रीच्या व्यवसायाचा प्रशासनाने खोलवर तपास करावा ही विनंती. त्यांने हिंदुराष्ट्र सेना प्रमुख धनंजय भाई देसाईंवर केलेल्या खोट्या केसचा प्रशासनाने खोलवर तपास करून ह्या षड्यंत्रात सहभागी असणाऱ्या सर्वच संबंधितांवर कडक कारवाई करावी व धनंजय भाई देसाई यांना सन्मानाने मुक्त करून जनमाणसाचा आदर राखावा.
धनंजय देसाई हे राष्ट्रीय स्तरावरील नामांकित आणि प्रतिष्ठित व्यक्तींपैकी हे एक आहेत. धनंजय भाई देसाई यांनी देव देश आणि धर्मासाठी , भारत मातेच्या रक्षणासाठी देशात युवकांची मोठी शक्ती निर्माण केलेली आहे. हिंदुराष्ट्र सेनेने देशभरात राष्ट्रभक्तीचे कार्य केलेले आहेत व करत आहेत परंतु सध्या श्री.धनंजय भाई देसाई यांना षडयंत्र करून अटक केलेली आहे. तरी त्यांना न्याय मिळावा म्हणून प्रत्येक राज्यात हिंदुराष्ट्र सेना व सगळं हिंदू समाज च्या वतीने त्यांच्या सन्माननीय सुटकेची प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे.
हिंदूराष्ट्र सेना नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख दासोपंत गोस्वामी, स्वप्निल भोसले, शुभम स्वामी, अक्षय भोयर पाटील, बळीराम लाला, शुभम लाला, प्रसाद भोसले, अजय भालेराव अजय भोसले, नारायण दासे,ऋषी दासे, ह्यांच्या सह अनेक हिंदूराष्ट्र सेनेचे हिंदुराष्ट्रवीर उपस्थित होते.