हिमायतनगर प्रतिनिधी | नागेश शिंदे | शहरातील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय येथे दिनांक 18 जुलै रोजी माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एक कार्यशाळा घेण्यात आली त्यात हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात दिनांक एक जानेवारी 2024 पर्यंत ही मतदार यादी पूर्ण तयार करायची आहे ही मतदार यादी अचूक व पारदर्शक करण्यासाठी 20 जुलै ते 20 ऑगस्ट रोजी सर्व बी.एल.ओ.नी मतदारांच्या घरो घरी जाऊन आपले सर्वेक्षण करून ही यादी तयार करत सर्व नवीन मतदारांची नाव नोदणी करून घ्यावी असे आव्हान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी बोलताना केले आहे
या बाबत सविस्तर वृत्त असे की, हदगाव हिमायतनगर -84 मतदारसंघात दिनांक 1 जानेवारी 2024 पर्यंत मतदार याद्यांचे पुनर्नरीक्षण व शुद्धीकरण करण्याचां कार्यक्रम मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या प्रशिक्षण करत या कार्यशाळेस मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी यांनी असे सांगितले की येत्या एक जानेवारी 2024 पर्यंत सर्व मतदार याद्या तयार करून आप आपल्या परिसरातील नवीन मतदार व मयत झालेल्या मतदारांची नावे यादीमध्ये कमी करून नवीन मतदारांची नावे त्यात समाविष्ट करून ती कामे लवकरात लवकर पारदर्शकपणे पूर्ण करून ही यादी अचूक बनवा असे त्यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.
त्यानंतर हदगाव हिमायतनगर या दोन्ही तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांना पुढे मार्गदर्शन करताना त्यांनी असे सांगितले की फेरफार करण्यासाठी महिना दोन महिन्याचा कालावधी लागणे हे काम योग्य नाहीत किरकोळ तक्रारीचा निपटारा लवकरात लवकर जाग्यावर करून पंधरा दिवसात फेरफार झाला पाहिजे रस्ता तक्रार असेल तर 30 दिवसात आणि फारच तक्रार असेल तर 90 दिवसात फेरफार प्रकरणाचा निपटारा लावा अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित तहसीलदार ,मंडळ अधिकारी व तलाठ्यांना दिल्या पूर्वीसारख्या आस्था व्यस्थ पडलेल्या फाईली तशाच धूळ खात न ठेवता आप आपल्या फाईलींना शिस्तबद्धपणे ठेवण्याकडे लक्ष देण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारची दिरंगाई करू नये राजस्व अभियान यशस्वी राबवून वेळेवर पांदण रस्ते व अतिक्रमण झालेले रस्ते तात्काळ मोकळे करून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्यात असे जिल्हाधिकारी राऊत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
यात काही अडचण आल्यास उपविभागीय अधिकारी संगेवार मॅडम यांचा वेळोवेळी सल्ला घ्यावा अशा सूचना सुद्धा त्यांनी यावेळी बोलताना दिल्या यावेळी उपविभागीय अधिकारी अरुणाताई संगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले त्यानंतर येथील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटीला माननीय जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब यांनी भेट देऊन येथील श्री परमेश्वर महाराजांचे दर्शन घेत मंदिर परिसराची पाहणी केली यावेळी मंदिर कमिटी कडून त्यांचे स्वागत करण्यात आले
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार आदिनाथ शेंडे साहेब, हराळे साहेब, बि. डी. ओ. मयूर आंदेलवार ,नायब तहसिलदार सूर्यकांत ताडेवाड,निवडणूक अधिकारी चंदू राठोड तलाठी पुणेकर यांच्यासह दोन्ही तालुक्यातील मंडळ अधिकारी, तलाठी,बि.एल.ओ.,आशा सेविका सह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मशान भूमीच्या शेडचा प्रश्न मार्गी लावावा – परमेश्वर गोपतवाड
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज गावासह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीत शेड नाही, तसेच अनेक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी दोन दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. ही विदारक स्थिती लक्षात घेता स्मशान भूमी साठी शेड करण्यासाठी मंजुरी देऊन अंत्यसंस्कार साठी येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात अशी मागणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत यांना निवेदन देऊन केली आहे.