नांदेड दि१२ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती औचित्याने आज सहयोग सेवाभावी संस्थेत आज विद्यार्थ्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. केंद्र सरकारचा “माझी माती माझा देश” या अभिनव उपक्रम खऱ्यार्थी भारताचा सांस्कृतिक वारसा महान विचारांना समृद्ध करणारा आहे या अंतर्गत देशभरात विविध सामाजिक उपक्रम व वृक्षारोपणाचे कार्यक्रम संपन्न होत आहेत सादर उपक्रमांतर्गत करोडो वृक्षांची लागवड देशभरात होत आहे भारताच्या वनसंपत्ती द्विगुणित वाढ होत आहे असे ते म्हणाले. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड