हिमायतनगर प्रतिनिधी/- नांदेड जिल्ह्यातील तालुका मुदखेड निवघा येथील इयत्ता बारावी वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन कू सपना सतीश पेदे या मुलीचा मृतदेह दिनांक 12 जुलै रोजी विहिरीत सापडला त्या प्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी ह्याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित प्रकरणाचा जलद गतीने तपास करत आरोपी ज्ञानेश्वर पवार यांच्या विरोधात पोस्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली त्या घटनेचां हिमायतनगर येथील कासार समाज बांधवा कडून निषेध व्यक्त करत येथील तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे गृहमंत्री यांच्या कडे मागणी करण्यात आली आहे
सोन्या उर्फ ज्ञानेश्वर शिवाजी पवार या गावगुंडाने मयत मुलीची वारंवार छेड काढून तिचा छळ करत दि 12 जुलै रोजी तिचा बळी घेतला आहे त्या गाव गुंडाविरुद्ध पॉसको(बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत) अंतर्गत गुन्हा दाखल करुन दोषीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी दिनांक 17 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार मॅडम यांना हिमायतनगर तहसील कार्यालय येथे एक निवेदन देऊन करण्यात आली यावेळी कासार समाज बांधवांनी तीव्र भावना व्यक्त करत घटनेचा निषेध व्यक्त करत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथागृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पर्यंत ही बाब पोहोचवण्याची विनंती तहसीलदार यांना केली यावेळी माधव मांगुळकर, शिवाजी भंडारे, मारोती भंडारे, महावीर मांगुळकर, हरीश मांगुळकर सह हिमायतनगर शहरातील कासार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…