नांदेड – ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत विविध सरकारी योजना आणि सेवांचा लाभ एकाच छताखाली देण्यात येणार आहे. नांदेड मधील अबचल नगर येथील मैदानात रविवार दिनांक 25 रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. हेमंत पाटील यांनी कार्यक्रम स्थळी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी ते म्हणाले की ,या उपक्रमांतर्गत तहसील कार्यालय, पंचायत समितीतील विभाग, ग्रामपंचायत, कृषी, एकात्मिक बालविकास, भूमी अभिलेख ,पशुवैद्यकीय, शिक्षण विभाग, मनरेगा, ऊर्जा ,सहकार महिला व बालकल्याण विभाग आदी विभागांतर्गत येणाऱ्या सर्व सरकारी योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. या योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळावायासाठी शासन आपल्यादारी उपक्रमाची माहिती गावोगावी पोहोचवावी त्यासाठी सर्वेक्षणही करा असा आदेशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिला. कारण शासकीय योजना लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी या उपक्रमांतर्गत ,’जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची’ हे अभियान शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती ही नांदेड वासियांसाठी आनंदाची बाब आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना शासकीय योजनांशी निगडित कार्यालयांचे प्रतिनिधी व विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी एकाच छताखाली येऊन विविध योजनांचे लाभ देतील. कल्याणकारी राज्य व्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य दिले जात असून शासन स्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात आल्या आहेत मात्र त्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे योजनांची माहिती घेणे योजनेसाठी आवश्यक असलेले दस्तऐवज विविध कार्यालयात जाऊन जमा करणे, जमा केलेले कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रक्रियांमधून जावे लागते ही प्रक्रिया अनेक वेळा क्लिष्ट गुंतागुंतीची व वेळ खाऊ असल्याचे मत नागरिक व्यक्त करतात परिणामी या योजनांचा लाभ नागरिक घेऊ शकत नाहीत. म्हणूनच येत्या 25 तारखेला जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिरास उपस्थित राहून या योजनांची माहिती व लाभ करून घ्यावा व योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनास सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन खासदार हेमंत पाटील यांनी यावेळेस केले.
यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, आनंदराव बोंढारकर, महानगर प्रमुख अशोक उमरेकर, महानगर संघटक शिवाजी बोंढारे आदी उपस्थित होते. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड