नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क झोन बास्केटबॉल मुले, मुली स्पर्धा आज दिनांक ०१/०९ /२०२३रोजी यशवंत महाविद्यालयाच्या इंडोअर हॉलमध्ये संपन्न झाले आहेत. या स्पर्धेचे उद्घघाटन शारदा भवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. रावसाहेबजी शेंदारकर सर यांच्या हस्ते झाले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्रजी शिंदे सर तसेच शारदा भवन शिक्षण संस्थेचे कार्यकारणी सदस्य पांडुरंगरावजी पावडे साहेब तसेच ज्येष्ठ क्रीडा प्राध्यापक डॉ.झूजार सिंग शिलेदार सर, झोनचे सचिव डॉ. महेश वाकरडकर , क्रीडा मंडळाचे सदस्य डॉ. विक्रम कुंटूरवार पंच कमिटीचे सदस्य डॉ. बालाजी जाधव तसेच विधी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. चरणजितसिंग महाजन , उपस्थित होते.
या स्पर्धा अतिशय सुंदररित्या आयोजन केलेले असे यशवंत महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. मनोज पैंजणे डॉ. आश्विन बोरीकर , डॉ. अर्जुनसिंह ठाकूर बलदीप ठाकूर, डॉ.कौर मॅडम डॉ . गजानन कदम,अर्जुन यादव, व इतर पंच विविध महाविद्यालयातून आलेले क्रीडा संचालक संघ मार्गदर्शक खेळाडू आदी उपस्थित होते या स्पर्धेमध्ये मुलींच्या संघामध्ये श्री गुरूगोविंद सिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड हा संघ सर्वप्रथम आलेला आहे तर द्वितीय स्थानी यशवंत महाविद्यालय नांदेड या मुलींच्या संघाने यश मिळवलेला आहे मुलांच्या संघांमध्ये श्री गुरुगोविंदसिंगजी अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड हा संघ प्रथम स्थानी आहे तर द्वितीय स्थानी श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर चा संघ राहिलेला आहे तर तृतीय स्थानी श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचा यशवंत महाविद्यालयाचा संघ राहिलेला आहे सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम यशवंत महाविद्यालयाच्या इंनडोअर हॉलमध्ये घेण्यात आला होता.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यशवंत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पतंगे सर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा मंडळाचे सदस्य डॉ. विक्रम कुंटूरवार,डॉ. बालाजी जाधव यांची पण उपस्थिती होती व्यासपीठावर कझोन सचिव डॉ. महेश वाकरडकर व डॉ. अश्विन बोरीकर व डॉ. अर्जुनसिंह ठाकूर डॉ. बलदीप ठाकूर डॉ.कौर मॅडम व डॉ. गजानन कदम , अर्जुन यादव, विकास मेहरकर, महंमद अन्वर, साहेबराव शिंदे,सर्व विजेते, उपविजेते खेळाडू व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व कर्मचारी वर्ग इत्यादींची उपस्थिती होती. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड