हदगाव प्रतिनिधी /- तालुक्यातील हरडफ येथील रहिवासी ग्यानोबाराव विठ्ठल वाठोरे यांच्या शताब्दी वर्षा निमित्ताने पंचशील विद्यार्जन हायस्कुल हदगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुस्तक तुला कार्यक्रमाचे आज १५ जून गुरुवार रोजी आयोजन करण्यात आले आहे.
![](https://satyaprabhanews.com/wp-content/uploads/2023/06/IMG-20230615-WA0019-300x250.jpg)
आदर्श विद्यार्जन मंडळ द्वारा संचलित पंचशील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष नांदेड जिल्ह्याचे पहिले माजी खासदार कालवंश हरिहरराव सोनुले यांचे आज 15 जून रोजी 53 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने आदर्श विद्यार्थ्यांना मंडळाचे अध्यक्ष ग्यानोबाराव विठ्ठल वाठोरे यांच्या शताब्दी वर्षा निमित्ताने संस्थेचे सचिव सुनील भाऊ सोनुले यांच्या संकल्पनेतून अध्यक्षांचे पुस्तक तुला हा कार्यक्रम आज संपन्न होणार आहे तरी परिसरातील जनतेने उपस्थित रहावे असे आव्हान पंचशील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद व वाठोरे परिवारांनी केले आहे