नांदेड दि.१४: मागासवर्गीय विध्यार्थ्याकडून शौक्षणिक फीस वसुल करणाऱ्या महाविद्यालयाच्या प्रचार्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी भीम प्रहारने केली आहे.
शासन निर्णय १ नोव्हे २००३ नुसार शिष्यवृत्ती धारक कोणत्याही विध्यार्थ्याकडून कोणतीही फीस घेऊ नये,असे निर्देश आहेत.
मराठवाड्यात नामांकित असलेल्या,नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या,सायन्स कॉलेजमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून, मागासवर्गीय विध्यार्थ्याकडून चार ते पाच हजार रुपये फीस वसुल करून प्रवेश दिला जात आहे,
या कॉलेजवर फौजदारी कार्यवाही करावी,अशी मागणी भीम प्रहारने केली आहे.आज समाजकल्याण उपआयुक्त बापू दासरी यांना भीम प्रहारचे प्रधान सचिव अमोल महिपाळे व सचिव प्रमोद वैद्य यांनी निवेदल देऊन मागणी केली आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे,पुढील वर्ग प्रवेशासोबत शैक्षणिक शुल्क वसूल करण्याच्या घटना घडल्या आहेत, शिष्यवृत्ती धारकांकडून शैक्षणिक शुल्क वसूल करू नये असा कायदा आहे,त्या कायद्याचे उलंघन नांदेड जिल्ह्यातील महाविद्यालयांचे प्राचार्य करीत आहेत.
जिल्ह्यातील मागासवर्गीय विध्यार्थ्याकडून फीस घेणाऱ्या सर्व महाविद्यालयावरती फौजदारी गुन्हे करावे,असे निवेदन भीम प्रहारचे प्रधान सचिव अमोल महिपाळे व सचिव प्रमोद वैद्य यांनी दिले आहे.. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड