हिमायतनगर प्रतिनिधी /-जालना जिल्ह्यातील अंतरवाली शिरोठा गावात मागील पाच दिवसापासून मराठा समाजाचे ओबीसी मधून आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने उपोषण चालू असताना उपोषण स्थळी पोलीस प्रशासनाचा मोठ्या संख्येने जमाव होऊन येथील मराठा समाजाच्या आंदोलनकांवर गोळीबार लाठीचार्ज व अश्रुधुरांचा वापर करून शांततेच्या मार्गाने सुरू असलेले मराठा समाजाचे आंदोलन चिरडण्याच्या हेतूने आंदोलनस्थळी उपस्थित मराठा समाजाच्या महिला, बालक, वयोवृद्ध यांना नाहक मारहाण करण्यात आली
या कृत्यामुळे संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे उपोषणकर्त्यावर केलेला गोळीबार व लाठीचार्ज या घटनेचा शिवसेना, (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या घटनेचा निषेध व्यक्त करत असून लाठीचार्ज गोळीबार करणाऱ्या वर कार्यवाही करण्यात यावी व सर्व घटनेची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन तहसीलदार हदगाव यांचे मार्फत राष्ट्रपती यांना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने देण्यात आले आहे
या निवेदनावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, महाराष्ट्र राज्य युवासेना विस्तारक कृष्णा पाटील आष्टीकर, तालुकाप्रमुख सुभाष जाधव, युवा सेनाप्रमुख अमोल पाटील रुईकर, व शहरप्रमुख राहुल भोळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी दिपक मुधोळकर, गजू पाटील धानोरेकर, अमोल पाटील, उत्तम हातमोडे, अवधूत देवसरकर, भोस्कर,सतीश पाटील रुईकर,सुनिल माने, साई पाटील व इतर शिवसेनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते