हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/- भारतीय जनता पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सुधाकर भोयर पाटील यांनी दि 13 सप्टेंबर रोजी हिमायतनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन तुप्तेवार यांची भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी व माजी बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल यांची नवनिर्वाचित तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र प्रसिध्दी माध्यमांना देऊन त्यांची निवड केली या निवडी बद्दल गावकऱ्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा श्री परमेश्वर मंदिर समोर येताच जेसीबी मधून त्यांच्या वर पुष्पवृष्टी करत ढोल ताशाच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत केले त्यानंतर त्यांनी येथील ग्रामदैवत श्री परमेश्वर महाराज यांचे दर्शन घेऊन आता आगामी काळात गाव तेथे शाखा , घर तेथे भा.ज.पा. कार्यकर्ता करणार असल्याचा संकल्प केला…
या बाबत सविस्तर वृत्त असे की भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी सुधाकर भोयर यांची निवडी झाल्यानंतर जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष निवडीकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले होते दि 13 सप्टेंबर रोजी हिमायतनगर तालुका अध्यक्ष पदी गजानन चायल यांची निवड केल्याचे पत्र प्रसार माध्यमांना कळताच हिमायतनगर शहरात भाजपा च्या निवडीचा जल्लोष व कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला तालुक्यातील भाजपामध्ये आगामी लोकसभा व विधानसभा व हिमायतनगर शहरातील नगर पंचायतच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात अनेक फेरबदल झालेले या निवडीत पहायला मिळाले आता २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद व नगर पंचायतच्या होणाऱ्या निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेऊन हिमायतनगर येथील भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष पदी माजी बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल यांची निवड करण्यात आली चायल हे हिमायतनगर तालुक्यातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रगण्य समजणारा चेहरा म्हणून तालुक्या सह मतदार संघात त्यांची वेगळीच ओळख निर्माण झालेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्ठीने दि 13 सप्टेंबर रोजी हिमायतनगर तालुका अध्यक्ष म्हणून गजानन चायल यांची निवड केली व जिल्हा सरचिटणीस म्हणून गजानन तुप्तेवार यांची निवड करण्यात आली त्यामुळे शहरातील असंख्य नव तरुण युवकांनी व गावकऱ्यांनी नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे जेसीबी मध्ये गुलाल व पुष्पवृष्टी भरून त्यांचे ढोल ताशाच्या गजरात भव्य दिव्य स्वागत केले
त्यामुळे हिमायतनगर तालुक्यात भा.ज.पा.ची मोठी ताकद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे पक्षाच्या सर्व नेत्याच्या मार्गदर्शनाखाली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब व जिल्हा अध्यक्ष सुधाकर काका भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर तालुक्यात आगामी निवडणुकीत जसे देशात मोदी पर्व आहे तसे हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातही निश्चितच भाजपाचे वारे मोठ्या प्रमाणात करून गाव तिथे शाखा, घर तेथे भा.ज.पा. कार्यकर्ता करण्याचा संकल्प नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष गजानन चायल व जिल्हा सरचिटणीस गजानन भाऊ तुप्तेवार यांनी केला आहे
यावेळी वैद्यकीय आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रसाद डोंगरगावकर, भाजपा अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष हिदायद खान, बालाजी ढोणे, रुपेश नाईक, रायपलवार काका, निकु ठाकूर, दुर्गेश मंडोजवार, सुधाकर चिठ्ठेवाड, पपू सोळंके,विपुल दंडेवाड,सदाशिव काळे,शीतल सेवनकर,परमेश्वर नागेवाड, अंबादास बास्टेवाड,हनुमान अरेपल्लू,सह विविध क्षेत्रातील राजकीय प्रमुख मान्यवर, व्यापारी ,पत्रकार,व ज्येष्ठ नागरिकांनी नवनिर्वाचित भाजपा कार्यकारणीचे भरभरून स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या…