नांदेड (प्रतिनिधी) दिनेश येरेकर दि.३. नांदेड शहरालगत असलेले बोंढार गावी दलित युवक उमद् नेत्रूत्व स्वाभिमानी युवक अक्षय भालेराव व आकाश भालेराव व इतर अनुयायांनी मिळून अनेक वर्षापासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली नाही म्हणून यावर्षी यावर्षी सर्व बौद्ध अनुयायांनी एकत्र येऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याची ठरवले व शासनाने घालून दिलेल्या अटीला अधीन राहून जयंती साजरी करण्यात आली. परंतु काही जातीवादी गावातील गावगुंडांनी ही जयंती साजरी केली हे सहन न झाल्याने लग्नाच्या वरातीत त्यांनी डी.जे च्या तालावर बेभान नाचून लाठ्या-काठ्या तलवारी घेऊन नृत्य केले त्याचवेळी त्याठिकाणी त्या दोन तरुणांना काही माहित नसल्याने ते दुकानावर सामान घेण्याकरिता आले होते परंतु त्याचवेळी त्या गावगुंडांनी त्या दोघांना मारायचे होते. परंतु एकाच गंभीर मार आकाश याला झाला व दुसरा अक्षय भालेराव याला पोटात धार धार शास्त्राने सफा सफ वार करून त्याचा खून करण्यात आला. हे कृत्य लोकशाहीच्या 75 व्या वर्षात लोकशाही व पुरोगामी महाराष्ट्रात हे करणारे गावगुंड कोणाच्या चिथावाणीने व त्यामागील सूत्रधार कोण त्यांच्या माध्यमातूनच व त्यांच्या सांगण्यातून गाव गुंडांनी बौद्ध वस्तीवर हल्ला करून खून करण्यात आला आहे .याची सविस्तर चौकशी करून पोलिसांनी त्वरित या कोण कोण कोण दोषी आहेत त्यांना अटक करून ती केस फास्टट्रॅक कोर्ट चालवावी व निर्णय लागेपर्यंत एकही आरोपीला सोडण्यात येऊ नये असे आपणास निवेदनाद्वारे कळविण्यात येत आहे. शासनानी विधिमंडळात मागासवर्गीयाच्या संबंधाने मागासवर्गीयावर शासन सेवेत व निम्म शासकीय संस्थेच्या सेवेत जातीयद्वेष भावनेने मागासवर्गीयांना त्याला सार्वजनिक जीवनातून लावण्याचा जातीवादी शक्ती काम करीत आहे.तरी अशा प्रकरणावर शासनाने वेगवेगळ्या अधिनियमाद्वारे अंकुश ठेवावा. व कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी खेड्यापाड्यात अल्पसंख्ये लोक राहतात ते जातीवादी गावगुंडांना सहन होत नाही. त्याचे राहणीमान त्याचा स्वाभिमान हे चांगले असल्याने जातीवाद्यांना आमच्या पुढे वाकून नमून आमच्या पायाखाली दाबून राहावे असे वाटत असून हे प्रकरण बौद्ध वस्तीवर हल्ले होत आहेत. तरी याची चौकशी करून संबंधितांना तात्काळ कठोर कार्यवाही करावे असे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने माननीय अरुण कांबळे लोहगावकर जिल्हाध्यक्ष यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे कळविण्यात आले आहे. # सत्यप्रभा न्यूज # नांदेड