हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे /- नांदेड जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबताना दिसत नाही नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आता टोकाचं पाऊल उचलताना दिसत आहेत. मागील काही दिवसापूर्वी सरसम येथील शेतकऱ्यांने आपलं जीवन संपवलं होते त्या पाठोपाठ दि 5 जून च्या रात्री अंदाजे 11 वाजता हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा नंबर दोन येथील शेतकरी रोहिदास उत्तम राठोड या शेतकऱ्याने महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज व भारत फायनान्स बँकेच्या कर्जास कंटाळून व सततच्या होत असलेल्या नापिकीला कंटाळून त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली त्याला पुढील उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे…
सध्या राज्यात भीषण दुष्काळ आहे पाण्यासाठी देखील वणवण करावी लागत आहे शेतीची अवस्था देखील बिकट आहे परिणामी तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून सततच्या नापिकी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज आणि भारत फायनान्स बँकेच्या कर्जबाजारीपणामुळे तालुक्यातील बोरगडी तांडा नंबर दोन येथील शेतकरी रोहिदास उत्तम राठोड वय 42 यांनी दिनांक 5 जून च्या रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्यांच्या पश्चात पत्नी,आई,वडील व दोन अल्पवयीन मुले असा परिवार आहे बँकेचे कर्ज आपल्याने आता फेडले जाणार नाही या विवंचनेने त्या शेतकऱ्यांने हे टोकाचं पाऊल उचलले असल्याचे उपस्थित नातेवाईकांनी सांगितले याप्रकरणी हिमायतनगर पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती…