कोल्हापूर :आपल्या आयुष्याला पहिला वळण देणारा निकाल म्हणजे दहावीचा निकाल… या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते. कोल्हापुरातील एका पठ्ठ्याची चक्क उंटावरून मिरवणूक निघाली. त्याला कारणही तसंच आहे. तू पास होणार नाही, असं मित्रांनी त्याला वर्षभर हिणावलं. पण पठ्ठ्या अभ्यास करत राहिला. सरतेशेवटी निकालादिवशी त्याने सगळ्या मित्रांची तोंडं बंद केली. मित्रांनीही त्याला सॅल्यूट ठोकून त्याची उंटावरुन मिरवणूक काढली…
हा प्रसंग आहे कोल्हापुरातला आणि विद्यार्थ्याचं नाव आहे समर्थ सागर जाधव… समर्थ कोल्हापुरातील एस एम लोहिया या हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकत होता. शाळेत अभ्यासात कमी आणि दंगा करण्यात एक नंबर असलेला मुलगा. त्यामुळे शाळेतील अनेक मित्र त्याला तू पास होणार नाही असे वर्षभर चिडवत राहिले. मात्र पठ्ठ्याने आपलं लक्ष विचलित न होता अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत तब्बल ५१ टक्के गुण घेत पास झाला.जे मित्र तू पास होणार नाही म्हणत होते त्याच मित्रांनी त्याची उंटावर बसवून कोल्हापूरच्या गंगावेश परिसरातून त्याची मिरवणूक काढली. गुलालाची उधळण करत आणि वाजत गाजत पेढे भरवत मिरवणूक काढल्याने या मिरवणुकीची चर्चा सध्या संपूर्ण कोल्हापुरात होत आहे. दहावीच्या जाहीर झालेल्या निकालात आपण ‘समर्थ’ असल्याचे दाखवून देत ५१ टक्के गुण मिळवून समर्थ पास झाला. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याची भविष्यवाणी करणारे तोंडावर पडले. पण समर्थला आश्चर्याचा धक्का देत त्यांनी त्याची उंटावरुन मिरवणूक काढत समर्थच्या यशाचा आनंद व्यक्त केला.
दहावीचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन जाहीर केला. छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यातून १ लाख ७६ हजार ८४६ परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी १ लाख ६४ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी दहावीचा टप्पा ओलांडला. निकालाची टक्केवारी ९३.२३ अशी आहे. लातूर विभागातील तीन जिल्ह्यातून १ लाख २ हजार ८८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी ९५ हजार ३४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ९२.६७ अशी आहे. यंदा निकालात प्राविण्य श्रेणीत उत्तीर्णतेचा टक्का कमी झाला. तर यंदा निकालात मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण पाच टक्क्यांनी अधिक आहे.
Follow
हायलाइट्स:
पास होणार नाही म्हणून वर्षभर मित्रांकडून हेटाळणी
भावड्याचा निकाल बघून दोस्तांनीच उंटावरुन काढली मिरवणूक
कोल्हापूरच्या चौकात राडा, गुलालाची उधळण, भावड्याचा नाद कुठं करता!
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
ब्लॉकबस्टर व्ह्याल्यू डेज- स्वयंपाकघरातील उपकरणांवर प्रचंड सवलत मिळवा
कोल्हापूर :आपल्या आयुष्याला पहिला वळण देणारा निकाल म्हणजे दहावीचा निकाल… या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं ही प्रत्येकाची इच्छा असते. कोल्हापुरातील एका पठ्ठ्याची चक्क उंटावरून मिरवणूक निघाली. त्याला कारणही तसंच आहे. तू पास होणार नाही, असं मित्रांनी त्याला वर्षभर हिणावलं. पण पठ्ठ्या अभ्यास करत राहिला. सरतेशेवटी निकालादिवशी त्याने सगळ्या मित्रांची तोंडं बंद केली. मित्रांनीही त्याला सॅल्यूट ठोकून त्याची उंटावरुन मिरवणूक काढली…
हा प्रसंग आहे कोल्हापुरातला आणि विद्यार्थ्याचं नाव आहे समर्थ सागर जाधव… समर्थ कोल्हापुरातील एस एम लोहिया या हायस्कूलमध्ये इयत्ता दहावी मध्ये शिकत होता. शाळेत अभ्यासात कमी आणि दंगा करण्यात एक नंबर असलेला मुलगा. त्यामुळे शाळेतील अनेक मित्र त्याला तू पास होणार नाही असे वर्षभर चिडवत राहिले. मात्र पठ्ठ्याने आपलं लक्ष विचलित न होता अभ्यास केला आणि दहावीच्या परीक्षेत तब्बल ५१ टक्के गुण घेत पास झाला.
एकाच घरात राहिले, एकत्रच अभ्यास केला, एक मार्क इकडे की तिकडे नाही, अगदी सेम टू सेम…!
जे मित्र तू पास होणार नाही म्हणत होते त्याच मित्रांनी त्याची उंटावर बसवून कोल्हापूरच्या गंगावेश परिसरातून त्याची मिरवणूक काढली. गुलालाची उधळण करत आणि वाजत गाजत पेढे भरवत मिरवणूक काढल्याने या मिरवणुकीची चर्चा सध्या संपूर्ण कोल्हापुरात होत आहे.
दापोलीच्या मनिषला छप्परफाड गुण, सर्वच विषयात पैकीच्या पैकी, १०० टक्के मिळवून बोर्डात पहिला
दहावीच्या जाहीर झालेल्या निकालात आपण ‘समर्थ’ असल्याचे दाखवून देत ५१ टक्के गुण मिळवून समर्थ पास झाला. त्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याची भविष्यवाणी करणारे तोंडावर पडले. पण समर्थला आश्चर्याचा धक्का देत त्यांनी त्याची उंटावरुन मिरवणूक काढत समर्थच्या यशाचा आनंद व्यक्त केला.
बालपणी लग्न, पतीचं निधन, कचरा वेचून शाळा शिकली, मायलेकाला एकत्रच दहावीत घवघवीत यश
निकालात मुलींचा दबदबा….
निकालात मुलींचा दबदबा पहायला मिळाला. बारावीप्रमाणे दहावी परीक्षेतही मुलांच्या तुलनेत मुलींनी निकालात बाजी मारली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातून ७९ हजार ३६१ मुलींनी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी ७५ हजार ९२४ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्णतेचे प्रमाण ९५.६६ टक्के आहे. मुलांच्या तुलनेत हे प्रमाण ४. ४१ टक्क्यांनी अधिक आहे. विभागात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.२५ टक्के असे आहे. लातूर विभागातून ४७ हजार ४४९ मुलींनी परीक्षा दिली. यापैकी ४५ हजार ९५ मुली उत्तीर्ण झाल्या. निकालाची टक्केवारी ९५.०३ अशी आहे. मुलांच्या तुलनेत ४.३८ टक्क्यांनी मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण अधिक आहे. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०. ६५ असे आहे. #सत्यप्रभा न्यूज #नांदेड