हिमायतनगर सारख्या ग्रामीण भागात जिथे सरकारी किंव्हा खाजगी वैद्यकीय सेवा वेळेवर पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी पोहोचून वाडी तांड्यातील नागरिकांना व रुग्णांना आरोग्याच्या माध्यमातून जगण्याची उमिद निर्माण करून देणारे डॉ. शिवप्रसाद लखपत्रे यांचे मोठे योगदान आहे
हिमायतनगर शहरात ओम मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारून मागील सहा वर्षापासून अविरत सेवा देणारे शहरातील डॉक्टर शिवप्रसाद लखपत्रे यांचा जन्म एका गरीब कुटुंबात दिनांक 17 फेब्रुवारी 1986 रोजी झाला शिवप्रसाद यांनी त्यांचे पहिली ते दहावीचे शिक्षण कुसुमताई प्राथमिक व माध्यमिक शाळा सिडको येथे घेतले त्यानंतर त्यांनी अकरावी व बारावी चे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी राजश्री शाहू विद्यालय लातूर येथून त्यांनी नीट सारखे अवघड परीक्षा त्यांनी पास करून एमबीबीएस औरंगाबाद घाटी येथील शासकीय रुग्णालयातून त्यांनी ते चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले त्यानंतर त्यांनी पुढील एम एस ची पदवी वैशंम पायन मेडिकल कॉलेज सोलापूर येथून पूर्ण केले त्यानंतर त्यांनी गोरगरीब नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी अविरत सेवे मध्ये दाखल झाले व उच्च तंत्रज्ञान वापरून त्यांनी हिमायतनगर तालुक्यातील रुग्णांना सेवा देण्यासाठी 2017 सालि त्यांचे सासरे विश्वंभर अण्णा मादसवार यांच्या मदतीने व काही डॉ.सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी हिमायतनगर शहरात ओम मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारून त्यांनी आजपर्यंत जवळपास दोन हजारच्या वर मोठे ऑपरेशन करून अनेक महिला व नागरिकांना जीवनदान दिले त्यामध्ये त्यांनी मागील वर्षी एका महिलेच्या पोटातून तीन किलोच्या मासाचा गोळा काढून दीड तास एक सर्जिकल ऑपरेशन करत त्या महिलेला जीवनदान मिळवून दिले त्यानंतर त्यांनी कोव्हिड सारख्या काळात हिमायतनगर व ग्रामीण भागातील तांड्या वस्त्यातील लोकांना शहरात एक खाजकी कोव्हीड केअर सेंटर उभारून त्यांना ऑक्सिजन उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवले अशा देवदूत समजल्या जाणाऱ्या डॉक्टर शिवप्रसाद लखपत्रे यांनी त्यांची अविरत सेवा मागील अनेक वर्षपासून चालूच ठेवत दर सहा महिन्याला हिमायतनगर शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये आरोग्य कॅम्पद्वारे येथील नागरिकांना ते आरोग्याचा सुविधा उपलब्ध करून देतात व गोर गरीब तांड्या वस्तीतील नागरिकांना ते अल्प दरात आपल्या हॉस्पिटलमध्ये उपचार देऊन त्यांच्यावर कमी पैशांमध्ये योग्य शस्त्रक्रिया करून नांदेड सारख्या ठिकाणी मिळणारा विलाज ते हिमायतनगर येथे करून त्यांना जीवनदान देण्याची ते अविरत प्रयत्न करत असतात त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रा बरोबरच त्यांनी सामाजिक शेत्रात सुद्धा आपली चागलीच पकड निर्माण केली आहे
नागेश परमेश्वर शिंदे.वैद्यकीय हिमायतनगर✍🏻