हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-तालुक्यात मागील आठ दिवसांपासून सतत झालेल्या अतिवृष्टीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी आज दिनांक 31 जुलै रोजी हिमायतनगर येथील तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेऊन सर्व मंडळ अधिकारी व तलाठी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाचे सरसकट पंचनामे करून ग्रामपंचायतीच्या चावडीवर अगोदर याद्या प्रसारित करूनच त्यांचे अहवाल सरकार दरबारी सरकार दरबारी सादर करावे असे आदेश दिले त्यात कुठलाही शेतकरी पंचनाम्या पासून वंचित राहता कामा नये अशा सूचना दिल्या
याबाबत सविस्तर वृत्त असे की मागील आठ दिवसांपासून हिमायतनगर तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाली त्यात एका दिवशी 105 मि.ली. मीटर पाऊस तर दुसऱ्या दिवशी 65 मि.ली. असे विक्रमी पाऊस होऊन त्याची विक्रमी नोंद झाली आहे तर काही ठिकाणी अनेक गोरगरीब नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे त्यांचे सुद्धा संबंधित ग्रामसेवक व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून त्यांना सानुग्रह घरपडीचे अनुदान मिळून देण्यासाठी मदत करावी व त्या घरपडीमध्ये कुठलेही लाभार्थी वंचित राहता कामा नये या अतिवृष्टीमध्ये तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनातं नुकसान झाले आहे त्यामुळे दि 31 जुलै रोजी आमदार साहेबांनी हिमायतनगर येथील तहसीलचे तहसीलदार यांना सोबत घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तेव्हा काही भागातील शेतकऱ्यांची शेती पाण्याने खरडून गेली आहे त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद तालुक्यातील मंडळ अधिकारी ,तलाठी व कृषी अधिकारीयांनी आपल्याकडे घेऊन त्याचे अहवाल शासन दरबारी जमा करावे अशा सूचना दिल्या यावेळी त्यांच्यासोबत हिमायतनगर येथील तहसीलचे तहसीलदार आदिनाथ शेंडे, नायब तहसीलदार ताडेवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड , माजी संचालक रफिक सेठ,प्रथम नगराध्यक्ष अब्दुल अखिल भाई,काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने ,सूर्यवंशी सर माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, बाकी सेठ ,पंडित ढोणे,परमेश्वर गोपतवाड, अंकुश मोरे, श्रीदत्त पाटील,संजय सुर्यवंशी, प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर, पापा पार्डीकर,सह तालुक्यातील आदी प्रशासकीय अधिकारी तलाठी ,ग्रामसेवक,पत्रकार व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….
⬛ चौकट ⬛
पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्याला मागितले पैसे म्हणून आमदार महोदयांनी भर सभागृहासमोर तलाठी जाधव यांची केली कान उघडणे..
हिमायतनगर शहरातील पंचायत समिती येथील वसंतराव नाईक सभागृहात अतिवृष्टीचे सरसगट पंचनामे करण्यासाठी आमदार साहेबांनी एक बैठक बोलावली होती त्या बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी तलाठी व ग्रामसेवक हे काम चुकार पणा करत असल्याचे आमदारांना सांगितले तेव्हा आमदार साहेबांनी भर सभागृहात उपस्थित तलाठी व ग्रामसेवक यांना चांगलेच खडसावले व शेतकऱ्यांच्या पंचनाम्यामध्ये कसूर कराल तर वरिष्ठांना सांगून कारवाई करू अशा सक्त सुचना सुद्धा उपस्थित तहसीलदारांसमोर कर्मचाऱ्यांना दिल्या…