नांदेड दि.१९ : स्वच्छता ही सेवा या अभियानांतर्गत देगलूर तालुक्यातील चालुक्यकालीन ऐतिहासिक वारसा असलेले एरगी गावात 17 डिसेंबर रोजी शाळकरी विद्यार्थी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्या सह सर्व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
देगलुर तालुक्यातील चालुक्यकालीन ऐतिहासिक वारसा असलेल्या येरगी गावात स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत काल रविवार 17 डिसेंबर रोजी संपूर्ण गावात स्वच्छता करण्यात आली. यात शाळकरी विद्यार्थी, सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. येरगीच्या या स्वच्छता अभियानात पहिल्यांदाच गावकरी स्वेच्छेने मोठ्या संख्येने सामील झाले असून गावचे सरपंच संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व सहभागी महिला व पुरुषांना मास्क व हॅन्ड ग्लोज चे वाटप केले. स्वच्छता अभियानाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली त्यानंतर गावातील सर्व रस्ते शाळा, मंदिराचा परिसर, ग्रामपंचायत परिसर, आरोग्य उपकेंद्र, ऐतिहासिक चालुक्य कालीन बारवाची स्वच्छता केली. स्वच्छता दरम्यानचा कचरा लगेच घंटागाडीतून गावाबाहेरील खड्ड्यात टाकण्यात आला. स्वच्छता अभियानात स्वच्छतेच्या संदेश देणाऱ्या गीतांचे प्रसारण करत स्वच्छता करण्यात आली यामध्ये गावकरी पुरुष यांच्याबरोबर शाळकरी विद्यार्थी, यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.यानंतरही गावात दर रविवारी सर्व गावकरी यांनी स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प केला.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड