नांदेड दि.२६: यादव अहीर गवली समाज क्रिकेट स्पर्धा १ मार्च ते ९ मार्च २०२५ दरम्यान मोदी मैदान,मामा चौक असर्जन नांदेड़ आयोजित केली आहे.महाराष्ट्रसह मध्यप्रदेश आणि तेलंगणा येथील २७ यादव समाजाचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्याला ५१ हजार रुपयांचे पहिले बक्षीस आणि उपविजेत्याला ३१ हजार रुपयांचे दुसरे बक्षीस दिले जाईल. त्या सोबत मॅन ऑफ द सिरीज , मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, सुपर फिफ्टी आणि सुपर सिक्स करिता अशी अनेक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

दर वर्षी ही स्पर्धा श्री यादव अहिर गवली समाज, नांदेड द्वारे आयोजित केली जात आहे, जो समाजाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. अशी माहिती कमल बटाउवाले, तुलजेश गुरुखुदे, विनय रौत्रे, सुंदरलाल परिवाले डॉ. कैलाश मंडले, दीपक जाफराबादी, विक्रम रौत्रे, शुभम पहाडीये,यांनी दिली. या स्पर्धेचा उद्देश तरुणांना खेळाच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी देणे आहे. तसेच समाजात एकतेची आणि सांघिकतेची भावना निर्माण व्हावी करिता ही स्पर्धा आयोजित केली जाते असे सुंदर भातावाले, ईश्वर रौत्रे, स्वराज बटाउवाले, बिरबल रौत्रे, मोनू गुरखुदे रवीभैय्या परिवाले, सचिन भातावाले, दिलीप मंडले, अभिमन्यू मंडले,साई बटाउवाले, अजय बटाउवाले, आशीष बटाउवाले, हरीश भगत, दर्शन फतेलशकरी, नागेश मंडले,कमलेश मंडले,सचिन खरे, यांनी सांगितले
या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांतील संघ सहभागी होतील आणि ही एक रोमांचक स्पर्धा असेल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कपिल रौत्रे, पवन कोतवाल, ललित बटाउवाले,पवनभैय्या मंडले, यश मंडले, निलेश भातावाले, अजय मंडले, भातेवाले, कैलाश परिवाले, शुभम चौधरी, रोहन कुटल्यावाले, मुकेश कोतवाल, गणेश रौत्रे, रवी परिवाले , अभिजीत भगत, शैलेश लंकाढाई, कार्तिक गुरखुदे, मोतीलाल लंकाढाई, ओम जागंडे, कृष्णा भगत,यदुराज मंडले, कैलास परिवाले आदी सदस्य परिश्रम घेत आहेत.
सर्व क्रीडाप्रेमी आणि समाजातील मानकरी वर्ग व प्रतिष्ठित समाज बांधवांनी या स्पर्धेत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावि असे. स्पर्धेच्या आयोजकांनी सांगितले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड