छत्रपती संभाजीनगर | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या आरक्षणासाठी राज्याचा दौरा करत आहेत. उपोषणानंतर जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यभर दौरा करणार असल्याचं सांगितलं.मनोज जरांगे पाटील राज्यभर जाहीर सभा घेत आहेत. त्यांच्या सभेला लाखो मराठा बांधव पाठिंबा देत असल्याचं दिसत आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला येत्या 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यामुळे सरकार आरक्षणाबाबत कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.जरांगे पाटील यांची सभा सुरु असताना दुसरीकडे ओबीसी समाज (OBC) यांची सुद्धा सभा सुरु आहे. त्यामुळे सभेवेळेस त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप करणं चालू आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये वंचित बुजन आघाडीचे पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलांना सल्ला दिला आहे.
प्रकाश आंबेडकरांनी कोणता सल्ला दिला? प्रकाश आंबेडकर यांची काल संविधान सभा पार पडली. सभेत बोलत असताना आंबेडकरांनी जरांगे पाटील यांना सल्ला दिला. ते म्हणाले की, “जोपर्यंत निजामी मराठा सत्तेत आहे तोपर्यंत मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी एक तारतम्य बाळगावे, जी चूक सोनिया गांधी यांनी केली होती. ती त्यांनी करु नये.”. सोनिया गांधी यांनी ‘मौत का सौदागर’ असे शब्द वापरुन विरोधकांना संधी दिली होती. यामुळे मराठा आरक्षणाच्या या लढाईत आपण भेदभाव करतोय, वेगळेपणा आणतो, असे कृपा करुन आणू नये. कारण आरक्षणासाठी ही मोठी लढाई आहे. दरम्यान, जरांगे पाटील माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की, हा सल्ला आपणास शंभर टक्के मान्य आहे. परंतु अजित पवार यांचा सल्ला मान्य नाही. त्यांनी आपणास सल्ला देण्याऐवजी आपल्या माणसांना सल्ला द्यावा, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला.
#सत्यप्रभा न्युज #छत्रपती संभाजीनगर