पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खर्या अर्थाने आदिवासी समाजाला सन्मान मिळवून दिला: डॉ.संतुकराव हंबर्डे
नांदेड दि.९: जगभरातील आदिवासी लोकांच्या हक्काचे रक्षण व वाजगरुकता वाढविण्याच्या उद्देशाने क्रांती दिन म्हणजे 9 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन साजरा केला जातो. देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांच्या रुपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तमाम आदिवासींचा विशेषतः आदिवासी महिलांचा सन्मान वाढविला आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष ताथा सहयोग सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ.संतुकराव हंबर्डे यांनी केले. सहयोग सेवाभावी संस्था विष्णुपुरी नांदेड संचलित इंदिरा इंटरनॅशनल पब्लिक स्कूल विष्णुपुरी नांदेड येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी अध्यक्षपदावरून डॉ.हंबर्डे बोलत होते.
पुढे बोलताना डॉ.संतुकराव हंबर्डे म्हणाले, आदिवासींना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने विविध योजना अंमलात आणल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी आश्रमशाळा, वसतिगृहे, याशिवाय नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात विकास होत असून दळणवळणाची सुविधाही उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्राचार्य डॉ. बालाजी गिरगावकर,शाळेचे मुख्याध्यापक विक्रम ढोणे,तृप्ती घुमाडे,अशोक मेटकर यांची उपस्थिती होती.सर्वप्रथम कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते हुतात्मा बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या नंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत गीताने स्वागत करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील विध्यार्थ्यानी विविध आदिवासी नृत्यांचे सादरीकरण केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संध्या अंकमवार, शेळके वंदना, युवराज पोरके,आशिष कहाळेकर, बुध्देव सोनपारखे व धोंडीबा वाघमारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड