हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरात जिल्हा उद्योग केंद्र व नांदेड पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तर्फे आयोजित सर्वसाधारण घटकातील सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांकरिता शहरातील परमेश्वर गल्ली येथील स्व.परमेश्वर शिंदे यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये कुंदन वर्क व एम्ब्रॉयडरी वर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 28 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कार्यकाळात घेण्यात आला होता या प्रशिक्षण कार्यक्रमाला महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.रेखा चव्हाण यांनी भेट देऊन उपस्थित प्रशिक्षणार्थी महिलांनी आत्मनिर्भर बनले पाहिजे ही एक काळाची गरज आहे असे अनमोल मार्गदर्शक सौ डॉ. रेखाताई चव्हाण यांनी केले त्यानंतर शहरातील पंचायत समिती विभागाला प्रशिक्षणार्थी महिलांनी भेट देण्यासाठी गेलेल्या महिलांना पाटील चित्रपटाचे अभिनेते विनय प्रताप देशमुख यांनी भेट देऊन महिलांचे मनोबळ वाढवण्यासाठी प्रोत्साहन देऊन मनोबल वाढविण्यासाठी अनमोल असे मार्गदर्शन केले त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
नांदेड जिल्ह्यातील महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासन वेग वेगळ्या योजने मार्फत महिलांकडून उद्योग उभारणीसाठी व मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची योजना आखत आहे शासना कडून मिळणारे अनुदान उद्योग संचालनालया मार्फत निर्धारित केलेल्या बँकामार्फत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात योजनेच्या मार्फत थेट कर्ज स्वरूपात अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे त्याच अनुषंगाने जिल्हा उद्योग केंद्र व नांदेड पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र तर्फे आयोजित सर्वसाधारण घटकातील सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांकरिता हिमायतनगर शहरातील मुख्य प्रशिक्षक संजय गुंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली परमेश्वर गल्ली येथे कुंदन वर्क व एम्ब्रॉयडरीवर आधारित एक महिन्याचे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. रेखाताई चव्हाण व पाटील चित्रपटाचे अभिनेते विनय देशमुख सह विविध प्रमुख मान्यवरांनी भेटी देऊन उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले यावेळी या कुंदनवर्क व एम्ब्रॉयडरी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या प्रशिक्षिका प्रिया नागेश शिंदे , वंदना परमेश्वर शिंदे , सोनीताई चौधरी, शशेकला चिट्ठेवाड,पूनम चव्हाण,मोनिका गायकवाड सह प्रशिक्षण घेणाऱ्या असंख्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या…