नांदेड दि.१३ : महाराष्ट्रासह आपल्या भारत देशाला अनेक महामानवांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राला अनेक महानायकांनी वैचारिक, सामाजिक, अध्यात्मिक दृष्टीने समृद्ध केले. अगदी तितक्याच ताकदीने राजमाता जिजाऊ मासाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर, शेख फातिमा, माता रमाई अशा क्रांतिकारी महानायिकांनी परंपरेच्या चौकटी मोडीत काढत नवा इतिहास घडवला. आम्ही अशा सर्व महानायिकांच्या विचारांचे वारसदार असून त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन येणाऱ्या पिढ्या समृद्ध करू असा संकल्प विश्व पब्लिक स्कूलच्या संचालिका आम्रपाली कैलास येसगे यांनी मांडला.
![](https://www.satyaprabhanews.com/wp-content/uploads/2024/01/image_editor_output_image807559554-17051580743767744252829550455448-1024x419.jpg)
मागील पाच-सहा वर्षांपासून नाविन्यपूर्ण, उपक्रमशील व आनंददायी शिक्षण देणारी शाळा म्हणून नावारूपास येत असलेली विश्व पब्लिक स्कूल, देगलूर येथे विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्यात्मक गुणांची पेरणी करण्याचे काम सातत्याने केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाई व शेख फातिमा जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अन्वी सचिन रेडेकर, सामाजिक कार्यकर्त्या फिरदोस फातिमा, डॉ. भाई सुनील जाधव, डॉ. विजय पाटील भाटापुरकर, पालक प्रतिनिधी दत्तात्रेय टोम्पे, सिद्धार्थ ढवळे, विश्व परिवाराचे संस्थापक कैलास येसगे कावळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी भाई सुनील जाधव यांनी जिजाऊ वंदना गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक अन्वी रेडेकर व फिरदोस फातिमा यांनी विद्यार्थी व शिक्षिकांना यथोचित असे मार्गदर्शन केले. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी यावेळी सर्व महानायिकांच्या जीवन चरित्रावर अभ्यासपूर्ण भाषणे केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वाती मनधरने, अवंतिका गंदपवार, अनिता शिरामने, जयश्री शिंदे, अश्विनी रावळकर, सिंधू येरापल्ले, आशाराणी रेड्डी, सारिका देवणे, शकुंतला कांबळे, महानंदा मठपती, शामल पोंगटवार या शिक्षिकांनी विशेष परिश्रम घेतले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड