विजय पाटील
लातूर दि.१२: लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. अमित देशमुख यांची नामांकन अर्ज मिरवणूक व प्रचार शुभारंभ सभा ऐतिहासिक झाली होती. त्यानंतर शहरातील प्रत्येक प्रभागात त्यांची स्नेह भेट प्रचार सभा, पदयात्रा, कॉर्नर बैठक, रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. लातुरातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा हे माझे कर्तव्यच असल्याचेही त्यांनी रॅली दरम्यान सांगितले.
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई देशमुख, ट्वेंटीवन अॅग्रोच्या संचालिका अदिती देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात जाऊन पदयात्रा, रॅली, कॉर्नर बैठका, प्रचार
सभा घेतल्या आहेत. आ. अमित देशमुख यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघात केलेली विकास कामे, अडीच वर्षातील महाविकास आघाडी सरकारचे काम, महाविकास आघाडी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची माहिती मतदारांना देऊन महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांना जनतेची सेवा पुन्हा करण्यासाठी विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. महाविकास आघाडी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते ‘डोर
टू डोर’ मतदारांच्या घरी जाऊन लातूर शहर विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांचे माहिती पत्रक व महाविकास आघाडी काँग्रेसचा जाहीरनामा मतदारांना देत आहेत. आतापर्यंत विरोधक भारतीय जनता पार्टी, वंचित बहुजन आघाडीची कुठलीही मोठी प्रचार सभा पदयात्रा झाल्या नाहीत. त्यामुळे अमित देशमुख यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून दिसून येत आहे. सर्वच जाती-धर्माच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात
सुरक्षेची भावना राहील असे वातावरण जपणे हे माझे
कर्तव्यच असेल, अशी ग्वाही जनसंपर्क रॅलीच्या समारोप प्रसंगी आ. अमित देशमुख यांनी दिली. लातूर शहरात प्रभाग १०, ११, १२ मधून जनसंपर्क अभियानांतर्गत प्रचार रॅली काढून नागरिकांशी संवाद साधला, रॅलीला प्रतिसाद दिल्याबद्दल एलआयसी कॉलनी, जुना रेणापूर नाका येथे रॅलीच्या समारोपप्रसंगी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले
#सत्यप्रभा न्यूज # लातूर