हिमायतनगर प्रतिनिधी/- श्री परमेश्वर मंदिर सभागृह येथे दिनांक 9 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता लक्ष्मण शक्ती कार्यक्रमाचे उद्घाटन बालयोगी व्यंकट स्वामी महाराज दत्त संस्थान पिंपळगाव यांच्या उपस्थितीत होणार आहे त्यासाठी हिमायतनगर तालुक्या सह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या लक्ष्मण शक्ती सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान शिवसेना तालुकाप्रमुख विठ्ठल ठाकरे यांनी केले आहे…
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील भावीक भक्तांना सुचित करण्यात येते की परमेश्वर मंदिर सभागृह येथे दि 9 जानेवारी रोजी लक्ष्मण शक्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी या लक्ष्मण शक्ती सोहळ्याची सुरुवात दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपासून होणार आहे या कार्यक्रमासाठी परमपूज्य महान तपस्वी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज श्री दत्त संस्थान पिंपळगाव यांची उपस्थिती लागणार आहे या साठी लक्ष्मण शक्तीच्या आयोजक ह भ प बापू महाराज आंदेगावकर, ह भ.प.शिवाजी महाराज वडगावकर हे असणार आहेत त्यासाठी तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख विठ्ठल ठाकरे यांनी केले आहे या कार्यक्रमानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन दुपारी तीन वाजेपासून करण्यात आले आहे याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती…