![](https://www.satyaprabhanews.com/wp-content/uploads/2023/10/IMG20231030132536-1024x576.jpg)
![](https://www.satyaprabhanews.com/wp-content/uploads/2023/10/IMG_20231030_164947-1024x573.jpg)
हिमायतनगर प्रतिनिधी नागेश शिंदे/-तालुक्यातील मौजे आंदेगाव पूर्व येथील ग्रामस्थांना मागील तीन महिन्यापासून म्हणजे जुलै,ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्यापासून येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडून गावकऱ्यांना राशन चे वाटप केल्या जात नाही त्यामुळे सबंधित गावकऱ्यांनी आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी हिमायतनगर येथील तहसीलदार यांना एक लेखी तक्रार देऊन संबंधित दुकानदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून अमरन उपोषण करू असे सांगितले
याबाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील मौजे आंदेगाव पूर्व येथील नागरिकांना मागील तीन महिन्यापासून येथील स्वस्त धान्य दुकानदार थोटे हे धान्य वाटप करीत नाहीत अशी तक्रार येथील ग्रामस्थांनी दिनांक 30 ऑक्टोबर रोजी हिमायतनगर येथील तहसीलदार यांना दिली आहे याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन दिवाळीपूर्वी येथील गोरगरीब नागरिकांना मालाची रिकवरी देऊन येथील पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानदारावर कठोर कारवाई करून येथील नागरिकांना स्वस्त धान्य देण्याची हमी देण्यात यावी अन्यथा पुढील महिन्यातील राशन सबंधित दुकानदारास वाटप करू जोपर्यंत मागील महिन्याचे राशन गोरगरीब नागरिकांना देण्यात येणार नाही तोपर्यंत गावाती नागरिक स्वस्त धान्य राशन घेणार नाहीत असा निर्धार त्यांनी यावेळी केला आहे याची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन येथील नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
यावेळी उत्तम राऊत, रमेश कालेवाड, माररोती येलकेवाड, अशोकराव सुबनवाड ,रुपेश नाईक, बालाजी भुसावळे ,मारोती माकलवाड ,बालाजी सुबनवाड ,संतोष खिल्लारे ,लखन काळबांडे, माजिद पठाण ,दत्ता मुतनेपाड ,दिगंबर दारेवाड ,अहमद पठाण, गणेश मॅकलवाड ,बाबुराव अक्कलवाड, प्रकाश येलकेवाड यांच्या सह असंख्य नागरिक व महिला उपस्थित होते