विजय पाटील
पैठण/गंगापूर दि.२५: महायुतीचे पैठण आणि गंगापूरमधील उमेदवार स्वतः कोट्यधीश तर आहेच, पण त्यांच्या पत्नीही कोट्यधीश आहेत. विलास भुमरे यांच्या पत्नी वर्षा यांच्या नावावर ४ मद्य विक्री परवाने आहेत. दोघेही उच्चशिक्षित असून, दोघांविरुद्धही न्यायप्रतिष्ठ गुन्हे आहेत. दोघांच्या मालमत्तेचा आणि वैयक्तीक तपशील जाणून घेऊय
उमेदवार विलास भुमरेंपेक्षा पत्नीचे वार्षिक उत्पन्न जास्त
विधानसभेच्या पैठण मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विलास संदीपान भुमरे यांनी गुरुवारी (२४ ऑक्टोबर) निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्जासोबत शपथपत्र सादर करताना त्यांनी स्थावर आणि जंगम मालमत्तेचा तपशील नमूद केला आहे. एमए उत्तीर्ण विलास भुमरे यांच्याकडे १९ कोटी १५ लाख २८ हजार ७१३ रुपयांची मालमत्ता असून, त्यांची पत्नी वर्षा यांच्या नावावर ४ मद्य विक्री परवाने असल्याचे म्हटले आहे.
अशी आहे प्रॉपर्टी विलास भुमरे यांच्याकडे २ कोटी २६ लाख ६७ हजार ४६७ रुपयांची जंगम मालमत्ता, १६ कोटी ८८ लाख ६१ हजार २४६ रुपयांची स्थावर मालमत्ता.वर्षा विलास भुमरे यांच्याकडे ७ कोटी ४१ लाख ८३ हजार ४०१ रुपयांची जंगम, ७ कोटी ४१ लाख ७ हजार १४७ रुपयांची स्थावर मालमत्ता.
-विलास भुमरे यांच्याकडे २ लाख ४० हजार रुपयांचे ३ तोळे सोने, त्यांच्या पत्नीकडे ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे ६ तोळे सोने.
-विलास भुमरे यांच्याकडे रोख ११ लाख रुपये तर त्यांच्या पत्नीकडे १ कोटी २४ लाख रुपये.विलास भुमरे यांचे वार्षिक उत्पन्न ७३ लाख ५९ हजार ८६६ रुपये तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न २ कोटी ४४ लाख १३ हजार ८५ रुपये.विलास भुमरे यांच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.आपल्याकडे दोन वाहने आणि शेतीही असल्याचे शपथपत्रात विलास भुमरे यांनी म्हटले आहे.
#सत्यप्रभा न्यूज # छत्रपती संभाजी नगर