वसमत दि.२२: वसमत कडक उन्हाळ्यातुन आता आपण निसर्ग नियमानुसार पावसाळयात आलो आहोत . कडक उष्णता ढगाळ वातावरणा मूळे कमी झाली आहे परंतू गर्मी कमी झालेली नाही.
पावसाळा लागल्या पासुन विदयुत महावितरणचा पून्हा ठिसाळ कारभार वसमत वासी भोगत आहेत .
सोसाटयाचा वारा सुटल्यावर लाईट जान सहाजीक आहे विज ग्राहक समजु शकतात परंतू हवा ,पाणी नसतानाही दिवसा व रात्री दहा वेळा लाईट बंद होण्याचे कारण काय ? समजायला मार्ग नाही . एकदा लाईट गुल झाली की घंटा घंटाभर लाईन येत नाही . आली की अर्ध्या एक घंट्याने पून्हा गायप होते . विदयूत यंत्रना काय करत आहे. इंजिनिअर साहेब कर्मचाऱ्यांना वाऱ्या वर सोडुन काय थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेले की काय ? असा प्रश्न ग्राहकांना पडत आहे. जसे विज बिल चोख पणे कर्मचारी वसुल करतात त्या प्रमाणे कडक लाईट गेली नाही पाहीजे . विदयुत स्पलाय कंट्रोल ऑफीस वर सक्षम कर्मचाऱ्याची नेमणुक असावी . पावसाळा अजुन सुरू होणे बाकीच आहे. वारंवार लाईट जात असल्याने विदयुत ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विदयुत पुरवठा खंडीत होण्याचे कारणावर काम करणे आवश्यक आहे . यंत्रना काय करत आहे ? हा प्रश्न जनता विचारत आहे. वारंवार लाईट जाण्याच्या कारणावर त्वरीत उपाययोजना करूण विदयुत ग्राहकांना त्रासातुन मुक्त करावे . इजिंनीअर साहेबांनी स्वःता लक्ष घालुन तांत्रीक अडचन सोडवावी असी मागणी होत आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड