नांदेड दि.२९: नांदेड नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष, लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या बाढदिवसानिमित्त दिनांक ३१/०५/२०२४ रोजी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदरील कार्यक्रमास शिवसेना उपनेते तथा नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख माननीय श्री. आनंदराव जाधव साहेब व मा. खा. श्री. हेमंत पाटील साहेब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती आन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे, जिल्हाप्रमुख आनंदराव बाँदरकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, सह संपर्कप्रमुख दर्शन सिंग सिद्ध, सचिन किसवे उपजिल्हाप्रमुख यांनी दिली आहे.
अवघ्या साडेचार वर्षाच्या काळात आपल्या कार्यकर्तृत्वांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासाची असंख्य कामे खेचून आणल्यामुळे आमदार बालाजीराव कल्याणकर यांची ओळख विकास पुरुष म्हणून निर्माण झाली आहे. जनसामान्यांच्या हितासाठी सदैव कार्मागरी करणारे आमदार बाल्नाजीराव कल्याणकर यांचा वाढदिवस याही वर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. दिनांक ०१/०६/२०२४ रोजी वाढदिवसानिमित्त सकाळी ठीक ०७:०० हनुमान गड, नांदेड येथे महाआरती आयोजित करण्यात आलो आहे. त्यानंतर भक्ती लॉन्स येथे भव्य रक्तदान शिबिर आणि नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याचवेळी गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय सुमन बालगृहात भोजनाची पंगत देण्यात येणार आहे. याशिवाय श्याम नगर येथील महिला रुग्णालयात फळे वाटप करण्यात येणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना आमदार बालाजीराव कल्याणकर यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख गंगाधर बडूरे, जिल्हाप्रमुख आनंदराव बोंढारकर, जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांच्यासह संपर्कप्रमुख दर्शनसिंह सिद् जिलप्रमुख मंगेशजी कदम यांनी दिली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड