नांदेड : मागील महिनाभरापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला अल्टिमेटम संपल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. या दरम्यान आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असून तशी शपथ गावकऱ्यांनी घेतली आहे.मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता. तो संपल्याने आता जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या नंतर नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्यात आलीय. हदगाव तालुक्यातील पाथरड गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्यात आली.
त्यासोबत गावकऱ्यांनी नेत्यांना गावात येऊ न देण्याची सामूहिक शपथ घेतली आहे.
#सत्यप्रभा न्यूज #नांदेड