हदगाव प्रतिनिधी / तुषार कांबळे
दिनांक : १९/१२/२०२४
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानिक पदावर असून सुद्धा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात जे वक्तव्य केले ते निंदनीय आहे आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, हे बोलण्यापेक्षा नाव घेण्यापेक्षा जर एवढे वेळेस देवाचे नाव घेतले तर स्वर्गप्राप्ती होईल असे त्यांनी विधान केले त्या विधानाच्या संदर्भात हदगाव तालुक्याच्या वतीने तसेच भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके व भीम टायगर सेनेची सर्व टीम च्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा नोंदवून त्यांना केंद्रीय मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी व त्यांच्या ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदवावा ही मागणी तात्काळ मान्य नाही झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर भिम टायगर सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी हदगाव तहसीलचे तहसीलदार श्रीमती नांदे मॅडम यांच्यामार्फत भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.