हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघामध्ये दोन दिग्गज नेत्यांमध्ये विधानसभेची लढत असल्याचे पाहायला मिळत आहे त्या लढतीच्या तोंडावर विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना एन निवडणुकीच्या तोंडावर मित्र पक्षाच्या उ.बा.टा. गटातील अंतर्गत गटबाजीचा फटका बसणार असल्याचे दिसून येत आहे नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मागील 30 वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ते असलेले असंख्य शिवसैनिकांनी उबाटा गटातील अंतर्गत गट बाजीला कंटाळून आगामी काही दिवसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या कामाला प्रेरित होऊन शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सध्या हिमायतनगर शहरातील राजकीय वर्तुळात रंगत आहे एन निवडणुकीच्या तोंडावर हदगाव हिमायतनगर विधानसभे मध्ये हा महाविकास आघाडीला हा मोठा धक्का समजला जात आहे…..
हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या काँग्रेसकडून विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणि महायुतीच्या शिंदे सेने कडून बाबुराव कदम कोहळीकर यांच्यात थेट लढत होणार आहे परंतु अगोदरच महाविकास आघाडीच्या विद्यमान आमदारांना वंचित बहुजन आघाडीचे मोठे आव्हान या मतदारसंघात पाहायला मिळत आहे अगोदरच कार्यकर्त्यांची जमवा जमव आमदाराकडून होत असताना एन निवडणुकीच्या तोंडावर हिमायतनगर येथील उबाटा गटातील अंतर्गत गटबाजी ही चव्हाट्यावर आल्याचे एका राजीनामा पत्रावरून उघड झाले आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या परंपरागत मतांना आता हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये मोठा खिंडार पडणार असल्याचे दिसून येत आहे 25 वर्षापासून निष्ठेने काम करणाऱ्या उबाटा गटाच्या निष्ठावंत शिवसेनिकांनी पक्षातील अंतर्गत गट बाजूला कंटाळून एणं निवडणुकीच्या तोंडावर महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पक्षांमध्ये जाहीर प्रवेश करून त्यांना निवडून आणण्याची जिम्मेदारी या निष्ठावंत शिवसैनिकांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांच्या मत विभाजनाचा मोठा धक्का काँग्रेस पक्षाच्या विद्यमान आमदारांना बसणार असल्याची जोरदार चर्चा सध्या शहरात रंगत आहे
चौकट
1995 ची शिवसेना पुन्हा उदयास येणार :- विलास वानखेडे
नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभेवर शिवसेनेचे कायम वर्चस्व राहिले होते पण आत्ताच्या अंतर्गत गटबाजीमुळे उबाटा गटाच्या वाट्याला केवळ एक विधानसभा आल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मोठी नाचक्की झाली आहे त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांना आता पक्षात मान राहिला नाही त्यामुळे हदगाव हिमायतनगर विधानसभेमध्ये सुद्धा हीच परिस्थिती पहायला मिळत आहे आगामी काळात उबाटा गटाला मोठी गळती लागणार आहे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेशकरून हदगाव हिमायतनगर विधानसभे मध्ये 1995 ची शिवसेना पुन्हा उदयास आणणार आहेत असे मत निष्ठावंत शिवसैनिक विलास वानखेडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिले आहे