२३ नोव्हेंबरला विद्यापीठात ६ विधानसभा व लोकसभेसाठी मतमोजणी
दिनेश येरेकर
नांदेड दि. २२ : नांदेड जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणूक व ९ विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. उद्या शनिवार २३ नोव्हेंबर रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये ज्ञान स्त्रोत केंद्र ( नॉलेज रिसोर्स सेंटर ) येथे सकाळी ७ वाजल्यापासून मतमोजणी सुरु होणार आहे. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर विधानसभा व लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. पहिल्या माळयावर खोली क्रमांक १०२ व खोली क्रमांक ६ याठिकाणी सहा विधानसभा क्षेत्राची मतमोजणी होणार असून सर्व मतयंत्र याठिकाणच्या स्ट्रॉगरुमध्ये पोहोचले आहे. तसेच दुसऱ्या माळ्यावर खोली क्रमांक २०२ ते २०६ मध्ये लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी होणार आहे. याठिकाणच्या स्ट्रॉगरुममध्ये मतयंत्र पोहोचली आहेत. उमेदवारांच्या उपस्थितीत सर्व मतपेट्या स्ट्राँगरुममध्ये बंद झाल्या असून सीसीटीव्हीच्या निगराणीत ठेवण्यात आल्या आहेत. २३ नोव्हेंबरला सकाळी उमेदवारांच्या व त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत मतदान यंत्र बाहेर काढले जातील व त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. याठिकाणी वेगवेगळे कक्ष करण्यात आले असून उमेदवारांचे प्रतिनिधींसाठी देखील थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभेची १४ टेबलावर मोजणी होणार आहे. लोकसभा व विधानसभेसाठी १४ गुन्हीले ६ असे टेबल लोकसभा आणि विधानसभासाठी असणार आहे. अंदाजे २४ ते २८ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
नांदेड लोकसभेसाठी १९ लाखांच्यावर तर विधानसभेसाठी २७ लाखांच्यावर मतदार संख्या आहे. दरम्यान काल झालेल्या मतदानात शेवटच्या मतदानाची आकडेवारी आज हाती आली आहे. रात्री उशिरापर्यत मतदान सुरु होते. त्यामुळे आज अंतिम आकडेवारी पुढे आली आहे. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भोकर मतदारसंघात सर्वात जास्त ७६.३३ टक्के तर सर्वात कमी ७६-उत्तरमध्ये ६०.६० टक्के मतदान झाले आहे. तर ८७-नांदेड दक्षिणमध्ये ६३.९९, नायगावमध्ये ७४.०२, देगलूर ६३.२२, मुखेड ७०.१४ टक्के मतदान झाले आहे, असे एकूण ६७.८१टक्के मतदान झाले आहे.
तर विधानसभेसाठी किनवटमध्ये ७१.९५ टक्के, हदगावमध्ये ७१.७७, भोकर मतदारसंघात ७६.३३, नांदेड उत्तरमध्ये ६०.६ टक्के, नांदेड दक्षिणमध्ये ६३.९९ टक्के, लोहा मतदारसंघात ७५.२ टक्के, नायगाव मतदारसंघात ७४.०३ टक्के, देगलूर मतदारसंघामध्ये ६३.२२ टक्के, मुखेड मतदारसंघात ७०.१४ असे एकूण 69.45 टक्के मतदान झाले आहे. विधानसभेसाठी सर्वात जास्त भोकर येथे ७६.३३ टक्के मतदान झाले आहे तर सर्वात कमी मतदान नांदेड उत्त्तर मध्ये ६०.६ मध्ये झाले आहे. दिनांक २० नोव्हेंबर रोजी उमेदवारांचे मतदान पेटीत भावितव्य हे बंद झाले होते. उद्या मतपेटीतून कोणत्या उमेदवारांचे भवितव्य उघडणार आता हे पहाणे हे आता महत्त्वाचं ठरणार आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड