नांदेड दि.२२ : दि. २१ ऑगस्ट रोजी पोलिस स्टेशन शिवाजीनगर येथे मोटार सायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणुन मोटार सायकल जप्त करण्याचे आदेश पोलिस निरीक्षक जालींदर तांदळे पोलिस स्टेशन शिवाजीनगर यांना दिले होते.
त्या अनुषंगाने दिनांक २१ ऑगस्ट२०२४ रोजी पोस्टे शिवाजीनगर गुरन ३४१/२०२४ कलम ३०३ (२ ) भा.न्या. संहीता कायदा प्रमाणे गुन्हा नोंद झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक श्री जालींदर तांदळे, पोस्टे शिवाजीनगर यांचे सुचने प्रमाणे पोलिस स्टेशन शिवाजीनगर येथील गुन्हे शोध पथक तपास करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, साहील राजु गोडबोले, वय २१ वर्षे, रा. आंबेडकरनगर, नांदेड अजय सुभाष पोहरे, वय २७ वर्षे, रा. जनता कॉलनी नांदेड हे मोटार सायकल चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेवुन मोटार सायकल चोरीचा तपास करीत असतांना सदर गुन्हयातील मोटार सायकल आम्हीच चोरलो असे सांगुन ती मोटार सायकल लेबर कॉलनी हनुमान मंदिरा समोर मोकळ्या जागेत ठेवल्याचे सांगीतले असता आम्ही सदर मोटार सायकल पंचा समक्ष ताब्यात घेवुन त्यांना आणखी विश्वासात घेवुन तपास केला असता, त्यांनी आणखी पाच मोटार सायकली चोरल्याची कबुली दिल्याने त्या मोटार सायकली आरोपी क्रमांक २ यांचे घरी जनता कॉलनी नांदेड येथे ठेवल्याचे सांगीतल्याने, आम्ही पंचा समक्ष त्या पाच मोटार सायकली जप्त केल्या. अशा एकुण चोरीच्या ६ मोटार सायकली किंमती ३,६०,००/- रू चा मुद्येमाल सदर आरोपीतांच्या ताब्यातुन जप्त करण्यात आल्या आहेत.
सदरची कामगीरी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, मा. श्री सुशिल कुमार, उपविभागीय पोलीस अधीकारी इतवारा चार्ज नांदेड शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री जालींदर तांदळे, गुन्हे शोध पथकातील सपोनि श्री अश्रुबा घाटे, पोलीस अंमलदार रविशंकर बामणे, देवासिंग सिंगल, शेख अझहर, राहुल लाठकर, सरबजीतसींग पुसरी, दत्ता वडजे यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड