नांदेड दि.१७: ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम नांदेड तर्फे महिलांसाठी सविता मंगल कार्यालय जांब जी. नांदेड येथे मोफत आरोग्य तपासणी व महिलांसाठीच्या शासकीय योजनांचा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन १६ जुलै २०२४ रोजी करण्यात आले होते. यासाठी प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान उपस्थित होत्या. तसेच मा. श्री बालाजीराव पाटील खतगांवकर, खाजगी सचिव मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देखील प्रमुख पाहुणे म्ह्णून उपस्थित होते. याशिवाय अयोग्यविषयक मार्गदर्शनासाठी डॉ वृषाली किन्हाळकर, संजीवन हॉस्पिटल नांदेड यांनी महिलांना सामोपदेशन केले आणि निमंत्रक अंबरीश कुलकर्णी, खजिनदार, ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम याप्रसंगी उपस्थित होते.
हा कार्यक्रम महिलांना त्यांच्या आरोग्याची आणि शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा होता. याप्रसंगी जवळपास १५०० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना मा. श्री बालाजीराव पाटील खतगांवकर, खाजगी सचिव मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य म्हणाले, ” महिलांना परमेश्वराने एक विलक्षण शक्ती दिली आहे मग ती शारीरिक असो अथवा मानसिक. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पार पडून देखील काम करणाऱ्या महिलांना बघितलं की महिलांना दुबळे म्हणणे पटत नाही. इथे उपस्थित असलेल्या तेजश्री मॅडम असतील अथवा डॉ किन्हाळकर असतील त्यांच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे त्यांची प्रेरणा घेण्याची गरज आहे.”
“महिलांसाठी अशा प्रकारचे कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करून एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे सर्वांची काळजी घेणाऱ्या खातगावकरांचे सर्वप्रथम मी आभार मानते. सर्व महिलांनी आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्याची काही घेण्याची गरज आहे कारण महिला या कुटुंबाचा एक महत्वाचा पाया आहेत आणि त्याच्याशिवाय कुटुंब चालणे शक्यच नाही. त्यांनी सकारात्मक मानसिकता ठेवणे गरजेचे आहे कारण दूषित मानसिकता अनेक रोगांचे कारण असते असे निदर्शनास आले आहे.”
डॉ वृषाली किन्हाळकर यांनी महिलांना त्यांच्या महिलाविषयक अयोग्याची काळजी कशी घ्यावी, आहार कसा असावा व मानसिकता कशी असावी यावर मार्गदर्शन केले. त्यांच्या मते, “महिलांनी स्वतःला आधी सक्षम समजले पाहिजे जेणेकरून त्यांना समाजात बरोबरीचे स्थान मिळेल.”
कार्यक्रमाची समाप्ती करताना निमंत्रक अंबरीश कुलकर्णी, खजिनदार, ट्रायबल मेन्सा नर्च्युरींग प्रोग्रॅम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि महिलांना शारीरिक व मानसिक आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहण्याचे आवाहन केले.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड