- नाराजीचे पडसाद आगामी विधानसभेत उमटणार….!
हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दिनांक 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या लेटर पॅडवर आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्यावर जळगाव जिल्ह्यात दाखल झालेला गुन्हा मागे घ्या व त्यांची बदली न करण्याची पत्र देऊन संबंध हदगाव हिमायतनगर तालुक्या सह महाराष्ट्रातील आदिवासी कोळी महादेव समाजाच्या त्यांनी भावना दुखावल्यामुळे आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी हिमायतनगर शहरातील महात्मा फुले सभागृह येथे सर्व आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांनी एक चिंतन बैठक घेऊन एक तिर एक कमान, सारे आदिवासी एक समान असा नारा देत या घटनेचा जाहीर निषेध करत विद्यमान आमदारांना त्यांनी आपण लोकप्रतिनिधी आहात अशी एकतर्फी भूमिका घेतल्यास आगामी विधानसभेत आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असा इशारा सुद्धा यावेळी दिला….
या बाबत सविस्तर वृत्त असे की संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण जातीवर चालत आपल्यामुळे विद्यमान आमदार महोदयांना सुद्धा विशिष्ट जातीचा पुळका निर्माण होत आहे की काय ? असे सध्या दिसून येत आहे मागे काही दिवसांपूर्वी हदगाव येथील मराठा समाज बांधवांच्या उपोषणाला सुद्धा आमदारांनी पाठिंबा देत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती त्यामुळे ओ.बी.सी.समाज नाराज झाला आता त्यानंतर आदिवासी या प्रवर्गात अनेक जाती आहेत पण इतर जातीचा कुठेही विचार न करता विशिष्ट एका जातीच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्यावर आदिवासी कोळी महादेव या समाजास अपशब्द वापरल्या प्रकरणी जळगाव जिल्ह्यात डॉ.राजेंद्र भारूड यांच्यावर तेथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल असताना सुद्धा ह्याची शहानिशा न करता संबंधित विशिष्ट प्रवर्गाची बाजू घेऊन त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याची व त्यांची बदली न करण्यासाठी एक त्यांच्या विधानसभा मतदारसंघाच्या लेटर पॅड वर महाराष्ट्राचे महामहीम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती त्यावरून हदगाव हिमायतनगर तालुक्यातील राजकारण वातावरण चागलेच तापले असल्याचे पाहायला मिळत आहे आज दिनांक 4 सप्टेंबर रोजी शहरातील महात्मा फुले सभागृह येथे सर्व आदिवासी कोळी महादेव समाज बांधवांनी विद्यमान आमदार यांच्या विरोधात एक बैठक घेऊन हदगाव येथील उपविभागीय कार्यालय येथे सादर करण्यात आलेल्या सर्व जातीच्या प्रमाणपत्राच्या संचिकेवर चर्चा करण्यासाठी व विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी डॉ. भारुड यांची बदली न करण्यासंबंधी दिलेल्या पत्रव्यवहारा बद्दल सखोल अशी समाज बांधवांसोबत चर्चा करून एक निर्णय घेतला की येणाऱ्या काळात विद्यमान आमदारांनी ज्याप्रमाणे डॉ. भारुड यांना पत्र दिले तसे समर्थनात एकपत्र जर का आदिवासी कोळी महादेव समाजास दिले नाही तर आगामी विधानसभेत त्यांना त्यांची जागा दाखवून देणार असल्याचा स्पष्ट पवित्रा त्यांनी घेतला असल्याचे दिसून आले त्यामुळे हदगाव हिमायतनगर तालुक्यात जातीवरून चांगले राजकारण तापल्याचे दिसून येत आहे
यावेळी आदिवासी कोळी महादेव समाजाचे हदगाव तालुकाध्यक्ष माधवराव बोईनवाड , हिमायतनगर तालुका अध्यक्ष रामेश्वर पिटलेवाड, नामदेव बोईनवाड,परमेश्वर बोईनवाड,नारायण सादलवाड, परसरराम जंगेवाड,तुकाराम गंपलवाड,मनोज मोदकुलवाड,दादाराव मामिलवाड,नागोराव गुंडेवाड,प्रकाश मुद्दनवाड, पांडलवाड, करडेवाड,रूद्र बोईनवाड, पूरनवाड, गुरगुटवाड, सादलवाड, जंगेवाड, भंडारवाड, घुमनवाड, तिगलवाड, बमलवाड सह टेंभी , सिबदरा , मंगरूळ,एकबा, सिरंजनी,सवणा, कांडली,पारवा, टाकराळा,राजवाडी सह आदी गावचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते