नांदेड दि.२८: साहित्यसम्राट, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम तालुक्यतील मौजे मंगरुळ येथे पार पडला. गावातील लहुजी वस्ताद साळवे चौकात असलेल्या लाल ध्वजाचे ध्वजारोहण करून या जयंती कार्यक्रमास सुरूवात झाली. बहुजन महामानवांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर आधारित मनोगत गावचे उपसरपंच तथा काँग्रेस(अ.जा.)तालुकाध्यक्ष श्री.संतोष आंबेकर यांनी व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरीक बालाजी पावडे सरपंच, पवन जयस्वाल पोलीस पाटील ,अंकुश जललवाड ग्रा.प सदस्य, मारोती सोमनवाड ग्रा प सदस्य, ग्रामपंचायत सदस्य लिगोजी आंबेकर ,दत्ता जललवाड ,किसन गुंटेवाड, मारुती सादलवाड, दयाकर सुदेवाड , आनंदा पिटलेवाड ,धर्माजी गंगुलवार, प्रवीण आंबेकर, ज्ञानेश्वर आंबेकर, सिद्धार्थ आंबेकर, शुभम गवळी ,राजू पुरंनवाड, कृष्णा पेंटेवाड, बाळू सादलवाड, गोलू बोरकर , दत्ता आंबेकर चंद्रकांत गवळी ,दिगंबर आंबेकर, शिवाजी आंबेकर ,प्रकाश आंबेकर,चंद्रकांत सोमेवाड,विनायक रामोड आदींची उपस्थिती होती.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड