नांदेड दि. 2 : नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने गुरुवार 4 जानेवारी 2024 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्याकडून ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. बेरोजगार उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नावनोंदणी करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करुन घ्यावा. या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड