नांदेड दि.८: दिनांक 07/05/2024 रोजी दुपारी चार वाजता फिर्यादी हा बँकेतुन 40,000/- रुपये उचलुन घरी जात असतांना त्याचे घरासमोरील रोडवर दोन अशात चोरटयानी त्यांची बॅग हिसकावली सदर फिर्यादीने प्रतीकार केला असता त्याचेवर अग्निशस्त्राने गोळीबार करून त्यांना जखमी करुन नगदी पेसे असलेली चंग घेवून पसार झाले सदर फिर्यादी यांचा शासकीय दवाखाना विष्णुपुरी येथे उपचार चालु आहे. सदर घटनेचौ माहीती मिळताच घटनास्थळी मा. श्री शशिकांत महावरकर, विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परीक्षेत्र नांदेड, मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. नांदेड, पोलीस निरीक्षक पो.स्ट. भाग्यनगर यांनी भेट दिली. सदर घटने बाबत पो.स्टे. भाग्यनगर येथे गु.र.न. 191/2024 कलम 394,397,34 भादवी व सहकलम 3/25, 27 (2) भाहका प्रमाणे
गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश मा. पोलीस अधिक्षक साहेब यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड यांना दिले होते. त्यावरुन स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी सदर
गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध करण्यासाठी सहा. पो. नि. श्री रवि वाहुळे, पोउपनि आनंद बिचेवार यांचे दोन टिम नेमुन पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी त्यांचे दोन टिमसह घटनास्थळी जावुन घटनास्थळाची पहाणी करुन आजू बाजुचे CCTV फुटेजची पहाणी करुन व माहीतगार यांचे मार्फतीने आरोपीचा शोध घेण्यात आला. माहीतगार यांचे कडून मिळालेल्या माहीती प्रमाणे सदर फिर्यादीची रेकी करणारा इसम नामे हरदिपसिंग पि. बलदेवसिंग डिल्लोन रा. दशमेश नगर बाफना नांदेड हा असल्याची माहीती मिळालेवरान सापळा लावुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे त्याचे नाव गाव विचारले असता हरदिपसिंग पि. बलदेवसिंग डिल्लोन वय 34 वर्षे व्यवसाय हॉटेल व्यापार रा. दशमेश नगर बाफना नांदेड असे सांगीतले. त्यास गुन्हया बावत अधिक विचारपुस केली असता त्याने फिर्यादीची रेकी करुन त्याचे साथीदार नामे 1. रोहीत सतपाल कोडा वय 25 वर्षे व्यवसाय बेकार रा. बरीवाला ता.जि. मुक्तसर साहीब (पंजाब) 2. सरप्रितसींग ऊर्फ साजन पि. एलबिरसिंग सहोता वय 24 वर्षे व्यवसाय बेकार रा. अमृतसर (पंजाब) यांना माहीती देवून सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली.
त्यावरुन त्याचे साथीदार विष्णुपुरी परीसरात असल्याची माहीती मिळाल्याने त्यांचा शोध घेत असतांना ग्रामीण तंत्रनिकेतन विष्णुपुरी चे पाठीमागील रोडवर विष्णुपुरी ते असदवन जाणारे रोडवर यातील
आरोपी यांना पोलीसाची चाहुल लागताच ते पळाले त्याचा पाठलाग करतांना एका आरोपीने पोउपनि श्री आनंद विचेवार यांचे पथकावर अग्निशस्वाने एक गोळी झाडली. पोलीस पथकाने त्यांचे स्वसंरक्षणासाठी त्यांचे सव्हीस पिस्टल मधुन दोन गोळ्या आरोपीच्या दिशेने झाडल्या, त्यात सदर आरोपीचे उजव्या पायाचे पिंडरीवर एक गोळी लागुन तो जखमी झाला त्यास तात्काळ वैद्यकीय उपचार कामी शासकीय दवाखाना विष्णुपुरी येथे उपचार कामी भरती करण्यात आले. जखमी आरोपीचे नाव सरप्रितसींग ऊर्फ साजन पि. दलबिरसिंग सहोता वय 24 वर्षे व्यवसाय बेकार रा. अमृतसर (पंजाब) असे असुन त्याचा दुसरा साथीदार नामे रोहीत सतपाल कौडा वय 25 वर्षे व्यवसाय बेकार रा. बरीवाला ता.जि. मुक्तसर साहीब (पंजाब) यास ताब्यात
घेवुन गुन्हया संबंधाने विचारपुस करुन आरोपीताकडुन गुन्हयात गेलेली नगदी रक्कम 40,000/- रुपये व गुन्हयात वापरलेले काळया रंगाची स्कुटी अॅक्टीवा क्र.एम.एच 26/ सीए/ 6200 व एक पांढऱ्या रंगाची व्हॅगनर मारोती सुजुकी कार एम.एच.26/ सीई/ 8062 गुन्हयात वापरलेली पिस्टल व चाकु असा एकूण 4,15,500/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. आरोपीने पोलीस पथकावर गोळीबार केल्या प्रकरणी पो.स्टे. नांदेड ग्रा. येथे गु.र.न. 359/2024 कलम 307, 353,34 भा.द.वि. सह कलम 3/25, 27(2) शस्त्र अधिनियम 1959 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलौस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, सपोनि रबि बाहुळे, पोउपनि श्री आनंद विचेवार, पोलीस अंमलदार माधव केंद्रे, गंगाधर कदम, बालाजी तेलंग, रुपेश दासरवार, गुंडेराव करले, संभाजी मुंडे, संजीब जिकलवाड, मोतीराम पवार, बालाजी यादगीरवाड, देवा चव्हाण, रंनधीर राजबंशी, गजानन बयनवाड, चालक मारोती मुंडे, हेमंत बिचकेवार, दादाराव श्रीरामे यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड