नांदेड दि.१०: नांदेड जिल्हयात मालाविरुध्दचया गुन्हयांना आळा बसविणेकामी व माली गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार यांनी पोलीस निरीक्षक, श्री उदय खंडेराय यांना आदेशीत केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेसाठी पथके तयार करुन सूचना दिल्या होत्या.
पो.स्टे. किनवट गुरनं २३५/२०२४ कलम ३०३(२),३०६भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. किनवट येथील भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेच्या एटीएम मशीन मधील ५०० रुपये दराच्या ३४७९नोटा ज्याची एकूण रक्कम १७,३९ ,5०० रुपये अज्ञात चोरट्याने त्यातील कॅसेटसह मशीन मधून चोरून नेले म्हणून गुन्हा दाखल होता.
मा. पोलीस अधीक्षक श्री अबिनाशा कुमार यांनी सदर गुन्हयांचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांना सूचना देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पो.नि., स्थागुशा यांनी सपोनि संतोष शेकडे यांचे अधिपत्याखाली एक पथक किनवटला रवाना केले होते. सदर पथकाने किनवटला जावून पो.स्टे. किनवट येथील तपासीक अधिकारी पोउपनि सागर झाडे व त्यांचे पोलीस अंमलदार यांना सोबत घेवून भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता बँकेतील शिपाई गितेश नारायण भिमनेन्नीवार याच्यावर संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने त्याचे बँकेतील सहकारी अकाउंटंट भारत सोनटक्के व क्लार्क रितेश विराळे याचे मदतीने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
सदर आरोपीतांकडून गुन्हयात चोरी गेलेले नगदी रुपये ११,००,००० व आरोपी नामे गितेश भिमनेन्नीवर याचेकडून चोरीच्या पैशातून खरेदी केलेले ४,६०,५००/- रुपयाचे सोन्याचे दागिणे असा एकूण १५,६०,५००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयातील आरोपी भारत देविदास सोनटक्के, वय ५८ वर्ष, भा.म.सह. बँक कॅशिअर, रा.एस.व्ही.एम. कॉलनी किनवट रितेश संग्राम विराळे, वय ३० वर्ष, भा.म.सह. बँक क्लार्क, रा. गोकुंदा, किनवट गितेश नारायण भिमनेन्नीवार, वय ३३ वर्ष, भा.म. सह. बँक शिपाई, रा. बेल्लोरी, किनवट यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी मा.श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा.श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. श्री सुनिल बिर्ला, पो.स्टे. किनवट, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड, सपोनि संतोष शेकडे, पोउपनि सागर झाडे, पोउपनि दिनेश येवले, पोलीस अंमलदार सुरेश घुगे, गजानन डुकरे, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, तानाजी येळगे, मोतीराम पवार, अनिल बिरादार यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड