नांदेड दि.३: मागील गुन्हयातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी पोलीस निरीक्षक, स्थागुशा नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यानुसार श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु केले होते.
स्थागुशाचे पथकास मिळालेल्या गुप्त बातमीआधारे दिनांक २ ऑगस्ट रोजी हिंगोली गेट कडे जाणारे रोडवरुन दिलीप अशोक कांबळे वय २५ वर्ष रा. अजनी ता. बिलोली जि. नांदेड अविनाश बाबु भरांडे वय२९ वर्ष रा. अजनी ता. बिलोली जि. नांदेड विधीसंघर्षीत बालक यांचेकडुन पोलीस ठाणे वजीराबाद गुरनं. २३२/२०२४ कलम ३७९ भा. दं. वि गुन्हयातील एक हिरो कंपनीची मोटार सायकल किंमती २००००/-रुपयाची हस्तगत करण्यात आले आहे. तसेच नमुद आरोपीतांकडुन पोलीस ठाणे रामतिर्थ गुरनं. २५/२०२४ कलम ३९२, ३३ भा द वि गुन्हयातील नगदी १२०० /- रुपये व पोलीस ठाणे देगलुर येथे गुरनं. २२२/२०२४ कलम ३९२ , ३४ भा द वि गुन्हयातील नगदी २६०००/- रुपये असे एकुण ३८,००/- रुपये जप्त करण्यात आले आहे. नमुद आरोपीतांना पोलीस ठाणे वजीराबाद येथे पुढील तपासकामी देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पो. नि. स्थागूशा नांदेड, पोउपनि / मिलींद सोनकांबळे, सपोउपनि/माधव केंद्रे, पोहेकॉ/रुपेश दासरवार, पोकों/बालाजी यादगीरवाड, ज्वालासिंघ बावरी, मारोती मोरे, चालक हनुमानसिंह ठाकुर, शेख कलीम स्थागुशा, नांदेड यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड