नांदेड दि.५.:श्री यादव अहिर गवळी समाज, नांदेड आयोजित २४ वा सामूहिक विवाह सोहळा आज संपन्न झाला. या सोहळ्यात एकूण २८ जोडप्यांचा विवाह झाला.
नरहर कुरुंदकर हायस्कूल कवठा नांदेड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला समाजातील मानकरी वर्ग, ज्येष्ठ सदस्य, मान्यवर आणि विवाहित जोडप्यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच जवळपास तीन राज्यातील चाळीस गावातून हजारो समाज बांधव उपस्थित होते.
श्री यादव अहिर गवळी समाजाचे चौधरी मानकरी वर्ग व सामूहिक विवाह सोहळ्याचे अध्यक्ष तसेच सदस्यांच्या हस्ते देवी देवतांच्या प्रतिमांचे पूजन दीपप्रज्वलनाने समारंभाची सुरुवात झाली. यानंतर, संपूर्ण यादव अहिर गवळी समाजाच्या चालीरीतीप्रमाणे अत्यंत कमी वेळेत अत्यल्प खर्चात वैवाहिक कार्यक्रम संपन्न करण्यात आले आणि संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान मंत्रोच्चारात आणि पवित्र अग्नीच्या साक्षीने सात फेरे घेऊन आपल्या नवीन वैवाहिक जीवनास आरंभ केला
तदनंतर समारंभात, मेळावा समितीचे अध्यक्ष आणि इतर सदस्यांनी विवाहित जोडप्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांना आनंदी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी श्री यादव अहिर गवळी सामूहिक विवाह समितीचे अध्यक्ष अध्यक्ष अर्जुनलाल कुटल्यावाले म्हणाले, “आमचा समुदाय नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर राहिला आहे. हा सामूहिक विवाह सोहळा आमच्या समुदायाच्या एकतेचे आणि सामाजिक सौहार्दाचे प्रतीक आहे.”
या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता नांदेड महानगरपालिकेचे उपायुक्त अजितपाल सिंग संधू ,नांदेड जिल्हा पोलीस प्रशासन तसेच
कवठा गुरुद्वारा साहेब येथील सर्व कर्मचारी व प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत मोलाचे सहकार्य केले
समारंभाच्या शेवटी, विवाहित जोडप्यांनी एकमेकांसोबत फोटो काढले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवले
या प्रसंगी समाजाचे चौधरी सर्व सन्माननीय मानकरी वर्ग शरद मंडले ,धन्नूलाल भगत, दुर्गाप्रसाद बटाऊवाले, भारत राऊत्रे, राजेश बटाऊवाले, पवन गुरखुद्दे, राजू लंकाढाई, पूनमचंद लंकाढाई, गिरीश भातावाले, सुंदरलाल भातावाले, दिनेश भातावाले,अर्जुनलाल लंकाढाई,पवन कुटल्यवाले, भिक्कालाल मंडले, दिनेश परीवाले , तुलसी मंडले, आनंद परीवाले , मनोज राऊत्रे, डॉ. कैलाश भानुदास यादव तसेच समाजातील अनेक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
#सत्यप्रभा न्युज #नांदेड