काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रतापराव देशमुख तर शहराध्यक्ष कैलास गोडसे यांची निवड
मुदखेड ता.प्रतिनिधी दि.२: नांदेड जिल्ह्यात येत्या 26 एप्रिल रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर मुदखेड तालुका आणि शहरात दिनांक 01 एक एप्रिल रोजी शहरातील
कालेजी देवी रणछोड मंगल कार्यालय येथे दुपारी 04.00 वाजता महाविकास आघडीच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आला होती यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विभिन्न विषयांवर चौफेर टीका करताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना मोदी की गॅरंटी नसून भारत सरकारची गॅरंटी असे वक्तव्य केले पाहिजे परंतु तसे दिसत आणि सामान्य लोकांचे न्यायासाठी उठणारे आवाज दाबले जातात आणि कोण्ही न्यायासाठी समोर येत नाही किती दुर्दैव असून पोषक लोकशाहीसाठी घातक असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस पक्षाने तालुका अध्यक्ष म्हणून प्रतापराव देशमुख, मुदखेड शहर अध्यक्ष म्हणून माजी नगर सेवक तथा समाजकारणामध्ये अग्रेसर असलेले कैलास गोडसे, तालुका कार्याध्यक्ष म्हणून महंमद गौस अब्दुल नबी,तालुका उपाध्यक्ष संतोष पाटील गाढे, दामोधर पाटील, गुळेवाळ,शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते, शहर सचिव अतीख अहेमद यांची नवीन कार्यकारणी मध्ये समावेश करण्यात आले, एम आय एम पक्षाचे नेते इलियास , अब्बासी यांचा काँग्रेस पक्षात जिल्हाध्यक्ष बी आर कदम यांनी काँग्रेस पक्षाची दस्ती आणि हार टाकून प्रवेश करून घेतला
या वेळी काँग्रेस पक्षाचे प्रभारी जिल्हाध्यक्ष बी आर कदम,काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी चव्हाण,केदार पाटील साळुंके,
उबाटे शिवसेना जिल्हा प्रमुख बबन बारसे, भुजंग पाटील,तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरिकर,शहर प्रमुख अविनाश झमकडे, शहर प्रमुख सचिन चंद्रे, शहर प्रमुख अंकुश भय्या मामीडवार,
,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवानंद शिप्परकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक तालुका अध्यक्ष बाळू पाटील मुंगल,
माजी नगराध्यक्ष राजाप्पा कोत्तावार, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी तथा उपाध्यक्ष शंकर सेठ राठी, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे, माजी उपाध्यक्ष करीम खाँ साब, माजी नगरसेवक गोविंद प्रसाद कालानी, भीम पाटील महादवाड,इकबाल कुरेशी,मोईन भाई फुलारी,
काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मुजीब पठाण,रमेश बोडके,गिरीश कोत्तावार, बालाजी मादमवाड सुरेश ढगे, गजानन संबोड, राधेश्याम ढगे,रमेश बोडके,पींटू ठाकूर, लतीफ टेलर, उपेंद्र देवदे ,भास्कर कळणे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्र संचलन बालाजी पाटील गाढे यांनी केले तर आभार नवनियुक्त शहर उपाध्यक्ष सूर्यकांत चौदंते यांनी केले
#सत्यप्रभा न्युज #नांदेड