मुदखेड प्रतिनिधी मोहम्मद करीम दि.४: मागील वर्षी मुदखेड शहरात जे भव्य अशा बौद्ध धम्म परीषदेचे आयोजन केले
ते पूर्णपणे समाजाच्या हिताचे ठरले. तीच परंपरा कायम राखत धम्म प्रचाराची दिशा बुद्ध विचाराकडे घेऊन जाण्याहेतू दि.३ मार्च २०२४ रोजी दुसऱ्यांदा समाज बांधवानी मुदखेड शहरात बौद्ध धम्म परीषदेचे आयोजन केले ते निश्चितच सार्थ ठरले.
येथील बौद्ध प्रशिक्षण संस्कार केंद्रात सकाळी ठिक ९:०० वाजता भदन्त डॉ.प्रा.एम. सत्यपाल महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.
तदनंतर समस्त भिख्खू संघाच्या उपस्थीतीत बौद्ध धम्म परिषद मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर उपासक अरविंद सोनाजी भक्ते यांच्या वतीने थायलंड वरून मागवलेली बुद्ध मुर्ती नालंदा चॅरिटेबल ट्रस्टला दान करण्यात आली व बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
प्रस्तूत धम्म परिषदेच्या शुभकार्यास भदन्त इंदवंस महाथेरो यांनी शुभाआशिर्वाद दिला.तथागत बुद्धांनी दिलेल्या पंचशिल तत्वाची शिकवन भंते यांनी ऊपस्थीत उपासकांना दिली.
म्हणजेच भक्तीभावाने दान करा, नेहमी नियमांचे पालन करा, ध्यानात मग्न राहा आणि चांगल्या पद्धतीने, तथागत बुद्धांच्या या तीन शिकवणी १) भक्तिभावाने दान करणे,2 ) नेहमी नम्रता राखणे, आणि 3) ध्यानाचा सराव कराव
यावेळी डाॅ उपगुप्त महाथेरो, भदंत डॉ. प्रा. एम. सत्यपाल महाथेरो, भदंत शिलरत्न थेरो, यासह भिख्खू संघ उपस्थीत होते.
या दुसऱ्या धम्म परिषदेच्या निमित्ताने का. एकनाथ थोरात यांच्या स्मरणार्थ थोरात परिवारांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तसेच मुदखेड ग्रामीण रुणालयाच्या वतीने पल्स पोलीओ बुथ उभारण्यात आले होते.
रात्री ९ वाजता महागायक अजय देहाडे, चेतन्य लोखंडे, शुभम मस्के, यांचा भीम गीत व बुद्ध गीतांचा कार्यक्रम रंगला होता यावेळी हजारोच्या संख्येने उपासक व उपासिका उपस्थीत होत्या.
हि दुसरी धम्म परिषद यशस्वी होण्यासाठी भीमनगर, नविआबादी, अशोकानगर, रेल्वे कॉलनी,लुबिंनी नगर, समतानगर, सिध्दार्थ नगर, महामाया महिला मंडळ, आणि नवयुवकांनी परिश्रम घेतले होते.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड