प्रशासनाने लक्ष घालून प्रश्न मार्गी लावण्याची नागरीकांची मागणी : मनपासह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
नांदेड दि१२: शहरातील अनेक मुख्य रस्त्यासह अंतगृत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून प्रशासनाच्या वतीने मागील सात-आठ महीन्यापासून खोदून ठेवलेल्या खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढणे कठीण झाले आहे शहरात मुख्य रस्ते खडेमय आणि अनेक ठिकाणी ड्रेनेज उघडे तर पिण्याच्या पाण्याच्या जलवाहीनीला अनेक ठिकाणी गळती त्यातही मजेशीर बाब म्हणजे रेल्वे स्टेशन येथून शहरात येणाऱ्या मेन रोडच बघा काय हाल आहे याचं ठिकाणी जिल्हा परिषद, न्यायलय, महानगर पालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय रुग्णालय,रेल्वे आणि बस ने येणारे हजारो प्रवासी दररोज ये-जा करतात परंतु प्रशासन व संबधित गुत्तेदाराच्या अक्ष्यम दुर्लशामुळे नागरिकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत
आजपर्यंत सत्ता एक हाती द्या असा नारा लोकप्रतिनिधींचा होता ती दिली तरी प्रश्न तसेच नांदेड च्या जनसामान्याशी पुढारी किंवा संबंधित आधिकारी कोणाला ही काही घेणे देणे नाही हेच यावरून दिसून येते आहे आपण फक्त दोन मिनिट गाडी या रस्त्यावर लावा आणि जाऊन येई पर्यंत गाडी कुठं लावली कळणार पण नाही, या धुळी मुळे आणि रोड ची अवस्था मुळे अनेकानेक शारीरिक इजा होतं आहे, दमा, मानेचे, कंबरेचे आजार वाढत आहेत असतांनाही कोणीही या वर लक्ष देत नाही,
झाले मतदान आता, आचार संहिता नाही आणि कोणालाही शहरा साठी काहीच काम करणे देखील नाही, स्वच्छ नांदेड चा नारा, बोजवारा शहरातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळणी झाली असून त्यामुळे मोठे व किरकोळ अपघात वारंवार होत आहेत तरी या संबधित अंत्यत संथ गतीने होणाऱ्या या कामामुळे नागरिकांच्या सोयी पेक्षा परेशानीतच वाढ झाल्याची संतप्त प्रतिक्रीया अनेक भागातील नागरीक व्यक्त करत आहेत
रेल्वेस्टेशन ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्ता बनला समस्यांचे माहेरघर
रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा रस्ता पूर्णपणे खोदून ठेवल्याने या मार्गावर असणाऱ्या महत्वपूर्ण शासकीय कार्यालय तसेच जिल्हापरिषद, न्यायालय , महापालिका व पुढे जिल्हाधिकारी तसेच तहसिल कार्यालय व पोलिस अधिक्षक यांचे कार्यालय आदीसह बाजारपेठेत जाण्यासाठी याच मार्गाचा अवलंब प्रवाशांसह स्थानिक नागरीकांना करावा लागतो परंतु या रस्त्याचे काम मागील कित्येक महीन्यापासून महासंथगतीने सुरू असून या रस्त्याच्या पुर्नबांधणीदरम्यान करण्यात आलेल्या खोदकामामुळे रस्त्यावर लहान मोठे अपघात सातत्याने होत असून प्रशासनाच्या दिरंगाईवर रेल्वे स्थानक परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्येकर्ते रहमत अली खान यांनी तिव्र नाराजी व्यक्त करून समस्या सोडविण्यासाठीची मागणी केली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड