नवि दिल्ली दि.१६: लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. निवडणुकीचा शंखनाद झाला असून मतदार देखील निवडणुकीसाठी उत्साही दिसत आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात निवडणूक एका उत्सवाप्रमाणे आहे. असे मुख्य निवडणूक अधिकार राजीव कुमार यांनी म्हटले आहे. देशात ९७ कोटीहून अधिक मतदार आहेत. ५५ लाखापेक्षा जास्त ईव्हीएम तयार आहेत. निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत. देशात दीड कोटी निवडणूक अधिकारी आहेत. १६ जूनला लोकसभेचा कार्यकाळ संपणार आहे. अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याआधी निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे. देशात महिला मतदारांची संख्या वाढली आहे. देशात असे काही मतदारसंघ आहेत जेथे महिला मतदारांची संख्या ही पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. तर देशात नवीन मतदारांची संख्या देखील वाढली असल्याची माहिती आयोगाने दिली आहे.
१.८२ कोटी नवीन मतदार
देशात २ लाखाहून अधिक मतदार १०० वर्षाचे आहेत. देशात १.८२ कोटी नवीन मतदार आहेत. महिला मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. ८५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या घरी जाऊन मतदान करुन घेणार आहोत. देशात साडेदहा लाख बुथ आहेत. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका होणार आहेत. हिंसामुक्त निवडणुका घेणे ही आमची जबाबदारी आहे. अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.
देशात ४७ कोटी महिला तर ४९ कोटी पुरुष मतदार आहेत. २ वेळा मतदान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. निवडणुकीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. मसल पॉवर रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणांसोबत काम करणार. पैशांचा गैरवापर होऊ देणार नाही.
सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. खोट्या बातम्यांबाबत सत्यतेची माहिती आम्ही देणार आहोत. कोणतीही माहिती हवी असेल तर वेबसाईटवर मिळणार आहे.
निवडणुकीत विमान आणि हेलिकॉप्टरने येणाऱ्या वस्तूंची देखील तपासणी केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुका 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान 7 टप्प्यात पार पडल्या होत्या. तर 23 मे रोजी निकाल लागला होता. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा 5 मार्च रोजी जाहीर झाल्या होत्या. 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीत 9 टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड