धर्माबाद
दत्तात्रय सज्जन दि.२:प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत धर्माबाद तालुक्यामध्ये अनेक लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला पण तयातीलच काही लाभार्थ्यांना मुदतीच्या आत जातीचे प्रमाणपत्र राशन कार्ड व इतर आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासाठी विलंब झाला त्यामुळे घरकुलासाठी आवश्यक असणारी कागदपत्र ठराविक कालावधीमध्ये गोळा करून संबंधित ग्रामपंचायतीकडे जमा केले नसल्याने तालुक्यातील अनेक पात्र लाभार्थी हे घरकुलापासून वंचित आहेत.
त्या करिता चालु वर्षात पंतप्रधान आवास योजनेची तालुक्यातील उद्दिष्टे म्हणजे जेवढे घरकुल आलेली आहेत, त्यामध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी रोशनगावचे उपसरपंच प्रतिनिधी नागनाथ माळगे व पत्रकार दत्तात्रय सज्जन यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांना व गौरगरिबांना आपल्या हक्काचे पक्के घर असावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ही राबवली जात आहे त्यासाठी शासनाकडून अनुदानही दिले जात आहे.
धर्माबाद तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत तालुक्यांमध्ये उद्दिष्टे वाढवून वंचित लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यासाठी गटविकास अधिकारी धर्माबाद यांच्याकडे नागनाथ माळगे व दत्तात्रय शंकर सज्जन यांनी मागणी केली आहे.
#सत्यप्रभा न्युज #नांदेड